टिकटॉक व्हिडीओसाठी धावत्या ट्रेनमध्ये स्टंट, रेल्वे पोलिसांकडून तरुणांची धरपकड

ठाणे : सध्याच्या तरुणाईमध्ये मोबाईलमधील सेल्फी व टिकटॉक अॅपची क्रेझ वाढताना दिसत आहे. त्यासाठी हे तरुण वाटेल तो धोका पत्करण्यास तयार असल्याचे नेहमीच समोर येते. असाच काहीसा प्रकार ठाणे ते मुंब्रा रेल्वेमार्गावर घडला. ठाणे-मुंब्रा रेल्वेमार्गावरील नव्या रेल्वे पुलाचा आधार घेत काही तरुण सेल्फी आणि टिकटॉक व्हिडीओ बनवत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे ठाणे रेल्वे सुरक्षा दलाने […]

टिकटॉक व्हिडीओसाठी धावत्या ट्रेनमध्ये स्टंट, रेल्वे पोलिसांकडून तरुणांची धरपकड
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

ठाणे : सध्याच्या तरुणाईमध्ये मोबाईलमधील सेल्फी व टिकटॉक अॅपची क्रेझ वाढताना दिसत आहे. त्यासाठी हे तरुण वाटेल तो धोका पत्करण्यास तयार असल्याचे नेहमीच समोर येते. असाच काहीसा प्रकार ठाणे ते मुंब्रा रेल्वेमार्गावर घडला.

ठाणे-मुंब्रा रेल्वेमार्गावरील नव्या रेल्वे पुलाचा आधार घेत काही तरुण सेल्फी आणि टिकटॉक व्हिडीओ बनवत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे ठाणे रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) छापा मारून दोन तरुणांना ताब्यात घेतले. मुकसिद इब्राहिम मुकादम आणि मोह. कासीम सय्यद (रा. मुंब्रा, बॉम्बे कॉलनी) अशी ताब्यात घेतलेल्या तरुणांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

धावत्या रेल्वेमधून बाहेर लटकणाऱ्या आणि स्टंट करणाऱ्यांविरोधात रेल्वे पोलिसांची कारवाई नेहमीच सुरु असते. मात्र, तरीही काही तरुण नवनवे साहसी फंडे अवलंबित असतात. आरपीएफकडे ठाणे ते मुंब्रा दरम्यान बांधकाम सुरु असलेल्या लोखंडी पुलावर काही तरुणमंडळी सेल्फी काढत असल्याच्या आणि आपला टिकटॉक व्हिडीओ बनवत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार आरपीएफने आज अचानक छापा मारून कारवाई केली, अशी माहिती आरपीएफचे पोलीस निरीक्षक ए.के. यादव यांनी दिली.

पाहा व्हिडीओ:

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.