Sharad Pawar : 7 जागांच्या भरवशावर त्यांना पडतायेत पंतप्रधानांचे स्वप्न; सुधीर मुनगंटीवार यांचा शरद पवार यांच्यावर तिखट हल्ला

Sudhir Mungantiwar attack on Sharad Pawar : भाजप आणि शरद पवार यांच्यात जोरदार शा‍ब्दिक चकमक घडत आहे. महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवार यांच्यावर तिखट हल्ला केला आहे. केवळ 7 जागांवर त्यांना कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतचा पुढारी व्हायचा टोला त्यांनी लगावला.

Sharad Pawar : 7 जागांच्या भरवशावर त्यांना पडतायेत पंतप्रधानांचे स्वप्न; सुधीर मुनगंटीवार यांचा शरद पवार यांच्यावर तिखट हल्ला
सुधीर मुनगंटीवार यांचा शरद पवार यांच्यावर तिखट हल्ला
Follow us
| Updated on: Jul 28, 2024 | 9:53 AM

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून भाजप आणि शरद पवार यांच्यातील वाकयुद्ध रंगलं आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांवर हल्लाबोल केला आहे. तर आता राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार यांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न जनतेने मदत न केल्याने तडीपार झाले. पंतप्रधान पद तर दूर ते गृहमंत्री पण होऊ शकले नाही. केवळ 7 जागांवर त्यांना कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतचा पुढारी व्हायचा टोला त्यांनी लगावला.

आरक्षणावर भूमिका स्पष्ट करावी

नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना, मराठा आरक्षणासंदर्भात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसने त्यांची भूमिका स्पष्ट करावी. राज्य सरकार तर थेट चर्चेस तयार आहे. त्यांनी पण भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे. सरकार मनोज जरांगे पाटील आणि ओबीशी नेत्यांशी वारंवार चर्चा करत आहेत. मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले. महाविकास आघाडीने आरक्षणासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला नाही. आता तरी त्यांनी ओबीसीविषयीची त्यांची भूमिका स्पष्ट करावी. महाविकास आघाडीला तर दोन्ही समाजात वाद निर्माण करायचा आहे. मराठा समाजाला ओबीसीतून की स्वतंत्र आरक्षण द्यायचे याविषयी महाविकास आघाडीने भूमिका जाहीर करावी, असे मुनगंटीवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

विरोधकांवर तिखट प्रतिक्रिया

ओबीसी, मराठा समाजासह विरोधी पक्षासोबत चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. पण विरोधक चर्चेपासून वाचत आहे. ते चर्चेवर बहिष्कार टाकत असल्याचा आरोप मुनगंटीवार यांनी केला. याविषयी शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन त्यांनी केले. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची आमची भूमिका असल्याचे ते म्हणाले.

सत्तेसाठी जातीचा आधार

वनमंत्रीने विरोधी पक्षावर सत्तेसाठी जातीचा आधार घेत असल्याचा हल्लाबोल केला. ही राजकारणासाठी धोक्याची घंटा आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही सजग नव्हतो आणि विरोधकांनी खोटे नरेटीव्ह पसरवले. संविधान बदलणार, मनुस्मृती लागू करणार असल्या गोष्टी पसरविण्यात आल्याने त्याचा फटका बसला. विरोधकांच्या या आरोपांना प्रत्युत्तर देण्याचे आवाहन त्यांनी केले.

बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'.
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा.
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?.
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा.
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल.
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?.
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.