मॅरेथॉन बैठक लावायला तयार, फडणवीसांना स्वतः भेटून सांगेन : सुधीर मुनगंटीवार
भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबई मेट्रोच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलंय.
मुंबई : भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबई मेट्रोच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलंय. मुंबईकरांच्या आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ. त्यासाठी मॅरेथॉन बैठका घेण्यास तयार आहे, असं मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी शिवसेना आणि भाजप राज्यात सत्तेवर असताना मुंबई मेट्रोचं अधिक वेगाने काम झाल्याचं सांगत आघाडी सरकारला टोलाही लगावला (Sudhir Mungantiwar comment on Mumbai Metro and cooperation from BJP).
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “आम्ही चर्चा करायला आजही तयार आहोत. अहंकाराची भावना आमच्यात नाही, कदाचित सत्ताधाऱ्यांकडे असावी. आजही आम्ही मॅरेथॉन बैठक लावायला तयार आहोत. देवेंद्र फडणवीस यांना मी स्वतः भेटून सांगेन आणि या विषयावर मुंबईकरांच्या महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ.”
“मुंबई आणि मुंबइकरांचे आमच्यावर आणि शिवसेनेवर समसमान प्रेम आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीवर जनतेने प्रेम केलेलं नाही. 1995 पासून मुंबईची जनता महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसला बाय बाय टाटा करत आहे. जनतेला मेट्रो हवी आहे. जनतेच्या हितासाठी आम्ही एकत्र बसायला तयार आहोत. उद्धवजींचा यू आणि देवेंद्रजींचा डी असा यूडी तयार होतो. त्यानेच खरी अर्बन डेव्हलपमेंट होते,” असंही सुधीर मुनगंटीवर म्हणाले.
“सेना-भाजपच्या काळात मेट्रोचं काम जलद गतीने पूर्ण केलं”
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “जे अहवाल तयार करण्यात आले त्याचा अभ्यास सत्ताधाऱ्यांनी करावा. काँग्रेसच्या काळात मेट्रोचे काम जलदगतीने पूर्ण झाले नव्हते. मात्र, सेना-भाजपच्या काळात हेच काम आम्ही जलद गतीने पूर्ण केले. याचा अर्थ आम्हाला मुंबईकरांची आणि जनतेच्या त्रासाची जाणीव आहे. राज्य कारभार करताना कोणीही सूडबुद्धीने राज्यकारभार करू नये. त्याने नुकसान सर्वांचेच होतं.”
हेही वाचा :
मला पाडून दाखवा, मुनगंटीवारांना अजित पवारांचं थेट चॅलेंज
भाजप बेसावध, ससा-कासवाच्या गोष्टीप्रमाणे पदवीधरमध्ये जिंकून येण्याचा आभास : मुनगंटीवार
संबंधित व्हिडीओ :
Sudhir Mungantiwar comment on Mumbai Metro and cooperation from BJP