Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आघाडी कृषी कायद्यांना विरोध करते, मग महाराष्ट्रात त्याविरोधात विधेयक मंजूर का करत नाही? : सुधीर मुनगंटीवार

कृषी कायद्यांना विरोध करारं आघाडी सरकार महाराष्ट्रात त्याविरोधात विधेयक मंजूर का करत नाही? असा सवाल मुनगंटीवार यांनी विचारला आहे.

आघाडी कृषी कायद्यांना विरोध करते, मग महाराष्ट्रात त्याविरोधात विधेयक मंजूर का करत नाही? : सुधीर मुनगंटीवार
Follow us
| Updated on: Dec 06, 2020 | 5:43 PM

मुंबई : भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच कृषी कायद्यांना विरोध करारं आघाडी सरकार महाराष्ट्रात त्याविरोधात विधेयक मंजूर का करत नाही? असा सवाल मुनगंटीवार यांनी विचारला आहे. महाआघाडीतील पक्षांमधील प्रेम पुतणा-मावशीचं आहे. त्यांची आघाडी 5 वर्षे नाही, तर 5000 वर्षे टिकू द्या, फक्त जनतेला जगू देत त्यांनी महाविकासआघाडीवर हल्ला चढवला (Sudhir Mungantiwar criticize MVA on Farmer Protest and Bharat Band0.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “शेतकऱ्यांच्या कायद्याचा अर्थ भ्रमनिरास करण्यासाठी होतोय, ते चांगलं नाही. शेतकरी कायद्याचा अर्थ चुकीचा काढला जातोय. आधीच्या सरकारचं धोरण शेतकऱ्यांचे मरण होतं. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी हाच या कायद्याचा उद्देश आहे. या कायद्यात कोणताही मुद्दा पटत नसेल, तर चर्चा आणि संवाद करता येऊ शकतो. योग्य पद्धतीने कायदा वाचला, तर अर्थ समजेल. उणीव असेल तर पंतप्रधान मोदी यांची वेळ घेऊन भेटा आणि चर्चा करा.”

भाजप महाराष्ट्र सरकार पाडणार?

भाजप राज्यातील आघाडी सरकार पाडणार का? या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, “महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारला संताजी धनाजी स्वप्नातही दिसतो. त्यांचा त्यांच्या आमदारांवर विश्वास नाही का? तुम्ही 5 वर्षे नको, तर 5000 वर्ष टीका. फक्त महाराष्ट्राच्या जनतेला जगू द्या आणि टिकू द्या. तुमचं प्रेम पुतणा मावशीप्रमाणे विखारी आहे”.

“मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करता, मग महाराष्ट्रात त्याविरोधात विधेयक मंजूर का करत नाही? शेतकऱ्यांच्या जीवनात बदल करायचा असेल, तर मग राज्यात अध्यादेश का काढत नाही? हे नेते सत्ताप्रिय आहेत. तुमच्या कुटुंबातील कोणी मंत्री होणार नाही अशी शपथ घ्या. ते घराणेशाही चालवत आहेत,” असा घणाघातही मनुगंटीवार यांनी केला.

हेही वाचा :

भाजप बेसावध, ससा-कासवाच्या गोष्टीप्रमाणे पदवीधरमध्ये जिंकून येण्याचा आभास : मुनगंटीवार

‘मोठा भाऊ पाहून कुंभकर्णानेही आत्महत्या केली असती, मुनगंटीवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

‘कोरोना व्हायरस ठाकरे सरकारला म्हणाला, नागपूरला याल तर त्रास देईन, मुंबईत तुमच्या वाटेला येणार नाही’, मुनगंटीवारांचा उपरोधिक टोला

Sudhir Mungantiwar criticize MVA on Farmer Protest and Bharat Band

अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार.
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले.
'वडिलांचं कर्तृत्व नसेल तर पराभव...', सरवणकरांचा अमित ठाकरेंना टोला
'वडिलांचं कर्तृत्व नसेल तर पराभव...', सरवणकरांचा अमित ठाकरेंना टोला.
बीडच्या सगळ्या गँगला आता सुतासारखं सरळ करणार; अजितदादांचा इशारा
बीडच्या सगळ्या गँगला आता सुतासारखं सरळ करणार; अजितदादांचा इशारा.
दादांनी महिला कार्यकर्त्याला झापलं, दादा बीडमध्ये बघा काय-काय घडलं?
दादांनी महिला कार्यकर्त्याला झापलं, दादा बीडमध्ये बघा काय-काय घडलं?.
वक्फ बोर्डाला धर्मनिरपेक्ष बनवायचे आहे - संसदीय मंत्री किरेन रिजिजू
वक्फ बोर्डाला धर्मनिरपेक्ष बनवायचे आहे - संसदीय मंत्री किरेन रिजिजू.
गंगाजल शुद्धच पण.., शिवसेनेकडून सेनाभवनासमोर बॅनरबाजी अन् मनसेला डिवचल
गंगाजल शुद्धच पण.., शिवसेनेकडून सेनाभवनासमोर बॅनरबाजी अन् मनसेला डिवचल.