Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हक्कभंग म्हणजे नेमकं काय? कोणत्या शिक्षेची तरतूद? वाचा सविस्तर

सुधीर मुनगुंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव (breach of privilege motion) दाखल केला.

हक्कभंग म्हणजे नेमकं काय? कोणत्या शिक्षेची तरतूद? वाचा सविस्तर
हक्कभंग प्रस्ताव म्हणजे नेमकं काय?
Follow us
| Updated on: Mar 04, 2021 | 2:33 PM

मुंबई : महाराष्ट्र राज्य विधिमंडळांचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. विधानसभेत भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगुंटीवार (BJP Sudhir Mungantiwar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव (breach of privilege motion) दाखल केला. प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी (Narhari Zirval) त्यानंतर हक्कभंगाचा प्रस्ताव हक्कभंग समितीकडे पाठवण्याचे निर्देश दिले. तर, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणारी अभिनेत्री कंगना रनौत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणारे पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला होता. अर्णव गोस्वामी यांना हक्कभंग समितीसमोर उपस्थित राहण्याची नोटीस देखील पाठवण्यात आली होती. त्यामुळे हक्कभंग म्हणजे नेमके काय? विधिमंडळाच्या सदस्यांना नेमके कोणते विशेष अधिकार असतात? हक्कभंग दाखल झाल्यास पुढे काय होते? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेणं गरजेचे ठरते. (What is Infringement breach of privilege motion know details)

संसद, विधिमंडळ सदस्यांचे विशेषाधिकार आणि हक्कभंग

भारतीय राज्यघटनेने संसदेतील लोकसभा आणि राज्यसभा खासदार आणि विधिमंडळातील आमदार अशा लोक प्रतिनिधींना काही विशेषाधिकार प्रदान केलेले आहेत. विधानसभेने एखाद्या विषयाचा अभ्यास किंवा चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीलाही असे विशेष अधिकार असतात. या अधिकारांच्या आड येणारे वक्तव्य किंवा वर्तन कोणत्याही व्यक्ती किंवा समुदायाला करता येत नाही, आमदार विधानसभेत जे विचार मांडतात त्यावर इतरांना विधानसभेच्या बाहेर टीका-टिप्पणी करता येत नाही, अन्यथा तो हक्कभंग ठरु शकतो. सभागृहाचा हक्कभंग आणि सदस्यांचा हक्कभंग अशा दोन प्रकारचे हक्कभंग असतात.

सभागृहाचा हक्कभंग किंवा अवमान झाल्याचा प्रकार सभापतींच्या संमतीने सभागृहाच्या निदर्शनास कसा आणला जाऊ शकतो?

1. विधिमंडळ सभासदाकडून तक्रार 2. विधानसभा सचिवांचा अहवाल 3. याचिका 4. सभागृह समितीचा अहवाल

(What is Infringement breach of privilege motion)

हक्कभंग कसा आणता येतो?

हक्कभंग प्रस्ताव मांडण्यासाठी लोकसभा, राज्यसभा किंवा विधिमंडळातील विधानसभा आणि विधानपरीषद या दोन सभागृहांच्या एकूण सदस्यसंख्येच्या 1/10 सदस्यांची सहमती आणि स्वाक्षरी असणं गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत 29 सदस्यांचा पाठिंबा असावा लागतो. हक्कभंकाची नोटीस देताना तो कुणाविरोधात आहे हे देखील सांगावं लागते.

हक्कभंग सिद्ध झाल्यास काय शिक्षा?

विधानसभेचा अवमान किंवा हक्कभंगास कारणीभूत व्यक्तीला शिक्षा करण्याचा अधिकारही सभागृहाला असतो. आरोपी स्वतः आमदार असेल तर सभागृहातून त्याची हकालपट्टी केली जाऊ शकते. आरोपी तिर्‍हाईत असेल तर समज देऊन सोडून देण्यापासून तुरुंगवास ठोठावण्यापर्यंत कोणतीही शिक्षा होऊ शकते. महाराष्ट्राचे माजी संसदीय कामकाज मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या विधानगाथा या पुस्तकात हक्कभंग कसा मांडता येतो याविषयी सविस्तर लिहिलं आहे.

आरोपीला समन्स पाठवून विधानसभेत बोलावले जाऊ शकते. समज देणे, ताकीद देणे, आरोपी आमदार असल्यास निलंबन किंवा हकालपट्टी करणे, दंड आकारणे, अटक करुन तुरुंगवास किंवा सभागृहाला योग्य वाटेल ती शिक्षा करण्याची तरतूद कायद्याने केलेली आहे.

संबंधित बातम्या :

राम मंदिराच्या नावाखाली भाजपकडून ‘टोल वसुली’, नाना पटोलेंचा गंभीर आरोप, फडणवीसांचंही प्रत्युत्तर

अजित पवारांविरोधात सुधीर मुनगंटीवारांचा हक्कभंग प्रस्ताव, जर प्रस्ताव सिद्ध झाल्यास शिक्षा काय?

(What is Infringement breach of privilege motion know details)

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.