आघाडी म्हणजे ‘वाह री सरकार तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल’; सुधीर मुनगंटीवारांची घणाघाती टीका

राज्य सरकारने दारु स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारची खिल्ली उडवली आहे.

आघाडी म्हणजे 'वाह री सरकार तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल'; सुधीर मुनगंटीवारांची घणाघाती टीका
चौकशीला का घाबरता? -मुनगंटीवार
Follow us
| Updated on: Nov 21, 2021 | 5:44 PM

मुंबई: राज्य सरकारने दारु स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारची खिल्ली उडवली आहे. महाविकास आघाडी सरकार म्हणजे तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल, अशी या सरकारची नीती आहे. जनतेच्या आशीर्वादाने लोकशाही मार्गाने सरकार निवडून येतात. त्या सरकारचा प्रत्येक निर्णय शेतकऱ्यांना समर्पित असतो. शोषित समाजाला समर्पित असतो. वंचित समाजाला समर्पित असतो. गोरगरिबांना समर्पित असतो. शेतमजुरांना समर्पित असतो. पण बेइमानीच्या आधारावर हे सरकार स्थापन झालेले आहे. जनतेने निवडून दिलेलं हे सरकार नाही, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली आहे. दारू स्वस्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यांचा हा निर्णय हर्बल वनस्पतीवाल्यांसाठी आणि क्रुझ पार्टीवाल्यांसाठी समर्पित आहे. सरकार पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करत नाही. दारूचे पण भाव कमी करून बेवड्यांना ऊर्जा देण्याचं काम हे सरकार करत आहे, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.

सरकारने माज दाखवू नये

सरकारने सत्तेची मस्ती करू नये आणि माज दाखवू नये. काही लोकांना माज आला तेव्हा जनता राग व्यक्त करते ना तेव्हा भल्याभल्यांना घरी बसायला लागतं. एसटीच्या संपात सरकारने योग्य भूमिका घेतली पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

भाजपकडून फसवणूक होत होती काय?

संजय राऊत यांचं वक्तव्य म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे. भाजपसोबत 30 वर्ष युती करणारे बाळासाहेब ठाकरे हे भाजपकडून फसत होते असा त्याचा अर्थ होतो का?, असा सवाल त्यांनी राऊतांना केला.

राजकीय पक्षांचा आडमुठेपणा

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना एसटी कामगारांच्या संपावरून भाजपवर टीका केली होती. एसटी कामगारांच्या संपावर अजूनही तोडगा निघाला नाही. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. परिवहन मंत्री अनिल परब यांचे प्रयत्न सुरू आहेत. ते दिवस रात्र बैठका घेत आहेत. काही संघटना आणि राजकीय पक्ष आडमुठेपणाने वागत असतील तर त्यातून अडथळे निर्माण होतात, असं राऊत म्हणाले होते.

संबंधित बातम्या:

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस अमरावतीच्या दौऱ्यावर, हिंसाचारात जखमी झालेल्यांची भेट घेणार

शिवसेनेला पुन्हा धक्का, रत्नागिरीत राष्ट्रवादीत इनकमिंग सुरुच, शिवसेनेच्या नगराध्यक्षा परवीन शेख यांच्या कुटुंबियांचा पक्ष प्रवेश

नको तिथं डोकं! खिडकीतून घुसण्यासाठी चोराने तीन महिन्यात 10 किलो वजन घटवलं, 37 लाखांवर डल्ला

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.