सुधीर मुनगंटीवार सोनार कधीपासून झाले?, राजकारणी आहात, कॅरेट तपासत बसू नका; अनिल परबांचा टोला

आता 24 कॅरेटची शिवसेना पूर्णपणे बदलली आहे, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. मुनगंटीवार यांच्या या टीकेचा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

सुधीर मुनगंटीवार सोनार कधीपासून झाले?, राजकारणी आहात, कॅरेट तपासत बसू नका; अनिल परबांचा टोला
अनिल परब, परिवहन मंत्री
Follow us
| Updated on: Nov 16, 2021 | 2:32 PM

मुंबई: आता 24 कॅरेटची शिवसेना पूर्णपणे बदलली आहे, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. मुनगंटीवार यांच्या या टीकेचा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी खरपूस समाचार घेतला आहे. सुधीर मुनगंटीवार सोनार कधीपासून झाले. राजकारणी आहात. राजकारणी राहा. कॅरेटबिरेट मोजत बसू नका, असा टोला अनिल परब यांनी लगावला आहे.

अनिल परब यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला. सुधीर मुनगंटीवारांनी सोनाराचा धंदा कधीपासून सुरू केला? त्यांना म्हणावं आपण राजकारणी आहोत, राजकारण करावं. कॅरेटबिरेट तपासण्याचं काम मुनगंटीवारांचं नाही, असं परब म्हणाले.

अजित पवारांशी चर्चा करणार

हायकोर्टाने नेमलेल्या समितीसमोर कर्मचाऱ्यांनी आपले म्हणणे मांडावे असं मी नेहमी सांगत होतो. आज या समितीची 5 वाजता बैठक होतंय. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. या बैठकीला एसटी कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनाही बोलावलं आहे. यानंतर बैठकीचा अहवाल समिती सीएमला देतील. एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या काय आहेत, त्यांना काय देता येऊ शकतं, याबाबत सातत्याने संबंधित मंत्र्यांशी चर्चा करत आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी पुन्हा एकदा बोलणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा करणार आहे. हा प्रश्न चर्चेतूनच सुटू शकतो, एसटी कामगारांनी संप मागे घ्यावा, असं आवाहन त्यांनी एसटी कामगारांना केलं.

खोत, पडळकर कमी पडले असतील

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्याशी मी दोन वेळा बोललो. त्यांच्यासमोर दोन प्रस्ताव ठेवले आहेत. ते कामगारांशी बोलून पुन्हा येतो म्हणून गेले आहेत. कदाचित कामगारांना समजावण्यात ते कमी पडले असतील किंवा कामगार त्यांचं ऐकण्याच्या मनस्थितित नसतील, असा चिमटा काढतानाच चर्चेची दारं खुली आहेत. कुणीही आमच्याकडे चर्चेसाठी यावं, असं आवाहन त्यांनी केलं.

आणखी कुणाशी चर्चा करू?

रोजंदारीवरील कर्मचारीही संपावर आहेत. त्यांना नोटीस दिली आहे. हे एकूण 1200 ते 1500 रोजंदारी कर्मचारी आहेत. त्यांनी कामावर आलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. आतापर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या 28 युनियनच्या कृती समितीसोबत मी चर्चा केलीय. आणखी कुणाशी चर्चा केली पाहिजे? असा सवाल करतानाच मी कुणाशीही चर्चा करायला तयार आहे. बोलणी करायला येतात व जातात. पण ते परत येत नाहीत, असं त्यांनी सांगितलं.

विलिनीकरणावर पर्याय नाही

एसटी बंद झाल्याने अवैध वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळं एसटी बंद करू नका. हे परवडणारे नाही. विलिनीकरण मागणीवर तूर्तास पर्याय नाही. आम्ही तुमच्यासोबतच आहोत. आम्ही तुमचे वैरी नाही, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

हे तर आजारी सरकार, आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार; नारायण राणेंची खोचक टीका

बहुचर्चित आमदार-मंत्री वादावर तूर्तास पडदा, कांदे म्हणतात समाधान, 90 टक्के निधी आत्ताच मिळाल्याचा भुजबळांचा दावा

कोल्हापुरात एमडी ड्रग्सचा कोट्यवधीचा साठा जप्त! फार्महाऊसवर सुरु होता कारखाना, एकाला अटक

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.