COVID-19 vaccine | सुधीर मुनगंटीवारांना कोरोना लसीचा पहिला डोस, गैरसमज काढून टाका, मुनगंटीवारांचे आवाहन
चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात सुधीर मुनगंटीवारांनी कोव्हिशील्डचा पहिला डोस घेतला. (Sudhir Mungantiwar COVID-19 vaccine)
चंद्रपूर : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी कोरोनाची लस घेतली आहे. चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात मुनगंटीवारांनी कोव्हिशील्डचा पहिला डोस घेतला. दरम्यान काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोनाची लस घेतली. तसेच याआधी राज्यातील अनेक नेत्यांनी कोरोना लस घेतली आहे. (Sudhir Mungantiwar Take First Dose COVID-19 vaccine)
मिळालेल्या माहितीनुसार, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी कोरोनाची लस घेतली आहे. सुधीर मुनगंटीवारांनी चंद्रपूर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात कोव्हिशील्ड लसीचा पहिला डोस घेतला. मुनगंटीवारासह त्यांच्या पत्नीनेही कोरोना लस घेतली आहे.
लसीविषयक गैरसमज काढून टाका, मुनगंटीवारांचा आवाहन
राज्यातील कोरोना लसीकरण मोहीम आता वेगवान झाली आहे. त्यामुळे या लसीविषयक गैरसमज काढून टाका, असे आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
सरकारने प्रायश्चित्त घेतले
सरकारने एमपीएससी परीक्षेची नवी तारीख जाहीर करून प्रायश्चित्त घेतल्याची प्रतिक्रिया दिली. कुणालाही विश्वासात न घेता निर्णय घेणे हे राज्य सरकारचे नवीन धोरण केले होते. राज्य सरकारची हुकूमशाही मार्गाने चालवली जाणारी लोकशाही सामान्यजनांसाठी घातक असल्याची टीकाही मुनगंटीवारांनी केली.
उद्धव ठाकरेंनी घेतली कोरोना लस
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (11 मार्च) कोरोनाची लस घेतली. मुंबईतील जे. जे. रुग्णालयात त्यांनी कोवँक्सिन या लसीचा पहिला डोस घेतला. देशभरात गेल्या 1 मार्चपासून दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी कोरोना लस घेतली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींनी कोरोनाची लस घेतली. यांनीही जे. जे. रुग्णालयात लस घेतली. तसेच, उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनीही यावेळी कोरोनाची लस घेतली. मुंबईतील जे. जे. रुग्णालयात ज्येष्ठ डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत कोरोना लस घेतली.
शरद पवारांना कोरोना लस
तसेच 1 मार्चला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील कोरोना लसीकरणे केले होते. प्राथमिक तपासणी झाल्यानंतर शरद पवार यांना सिरमची कोव्हिशिल्ड लस टोचण्यात आली होती. शरद पवार हे कोरोना प्रतिबंधक लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते ठरले होते. (Sudhir Mungantiwar Take First Dose COVID-19 vaccine)
संबंधित बातम्या :
देशी की परदेशी,पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेमकी कोणती लस घेतली?
CM Uddhav Thackeray Covid19 Vaccination | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेतली कोरोनाची लस