मुंबईचा पारा वाढला; वाढत्या उन्हाचा प्राण्यांना त्रास, वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांची खास व्यवस्था
मुंबईत (Mumbai) उन्हाचा कडाका वाढत आहे. वाढत्या उष्णतेचा (Heat) त्रास हा माणसांसोबतच मुक्या प्राण्यांना (Animals) देखील होतोय. याचाच विचार करून भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात प्राणी, पक्ष्यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे.

मुंबईत (Mumbai) उन्हाचा कडाका वाढत आहे. वाढत्या उष्णतेचा (Heat) त्रास हा माणसांसोबतच मुक्या प्राण्यांना (Animals) देखील होतोय. याचाच विचार करून भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात प्राणी, पक्ष्यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. त्यांच्यासाठी वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर खास थंड पाण्याची सोय करण्यात आली असून, पक्ष्यांना खाण्यासाठी फळे देखील देण्यात येत आहेत. या गारेगार पदार्थांमुळे प्राणी उत्साहाने बागडत असल्याचे पहायला मिळत आहेत. उन्हाळ्यात प्राण्यांना त्वचेचे आजार, डी हायड्रेशचा त्रास आणि उष्णतेमुळे होणाऱ्या इतस समस्या जाणवतात. प्राण्यांना त्रास होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे. प्राणी आणि पक्ष्यांच्या आहारात केळी, चिकू, भोपळा, अंबा अशा पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच बर्फाच्या लादीची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.
हत्तीच्या आहारात कलिंगड आणि शहाळ्यांचा समावेश
हत्तींच्या आहारात कलिंगड आणि शहाळ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच प्रण्यांना उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आईस केक देखील खाऊ घातला जात आहे. कलिंगड, पपई, केळी, चिकू आंबा अशा फळांचे तुकडे करून त्यामध्ये गुळाचा पाक करून टाकला जातो. त्यानंतर हे मिश्रण गोठवून त्याचा केक बनविण्यात येतो. हा केक प्रण्यांना खायला देण्यात येत आहे. सोबतच पाण घोड्याच्या आहार भोपळ्याचा तर माकडांसाठी आंबे आणि भूईमुगाच्या शेंगाचा समावेश करण्यात आला आहे.
वैद्यकीय पथकाकडून विशेष काळजी
सध्या मुंबईमध्ये उष्णता प्रचंड वाढली आहे. या उष्णतेचा मोठा फटका हा उद्यानातील प्राण्यांना बसत आहे. वाढत्या उन्हामुळे प्राण्यांना त्वचेचे आजार, डी हायड्रेशचा त्रास आणि उष्णतेमुळे होणाऱ्या इतस समस्या जाणवतात. प्राण्यांना यातील काही आजार होऊ नयेत यासाठी वैद्यकीय पथकाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. वैद्यकीय पथकाकडून प्राण्यांची देखरेख सुरू आहे.
इतर बातम्या
Gunratna Sadavarte: सदावर्तेंचे कारनामे; 250 डेपोंतून गोळा केले पैसे, संशयितांची कबुली काय?
Toilet Scam : टॉयलेट घोटाळ्यावर कारवाई करण्यापूर्वी आमच्याशी संपर्क करा; किरीट सोमय्यांचे पत्रं
Mega Block : आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, पाहा दिवसभरातलं संपूर्ण वेळापत्रक