Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SC On MLA Sanjay Raimulkar : आता फैसल्याची घडी समीप, आमदार संजय रायमुलकर यांची कामी येईल का बंडखोरी

MLA Sanjay Raimulkar : राज्यातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय रायमुलकर यांचा ही समावेश आहे.

SC On MLA Sanjay Raimulkar : आता फैसल्याची घडी समीप, आमदार संजय रायमुलकर यांची कामी येईल का बंडखोरी
Follow us
| Updated on: May 11, 2023 | 11:38 AM

नवी दिल्ली : राज्यातील सत्ता संघर्षाचे नाट्य आता अंतिम चरणात पोहचले आहे. अवघ्या काही तासांवर या नाट्याचा नाट्यमय अंत होणार हे निश्चित आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल काय येतो, याकडे संपूर्ण राज्याचेच नाही तर देशाचे लक्ष लागले आहे. पक्षांतर बंदी सारख्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेते हे हा निकाल अधोरेखित करेल. बंडखोरी केलेल्या आमदारांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणारे आमदार संजय रायमुलकर (MLA Sanjay Raimulkar) यांचा ही समावेश आहे. पेशाने डॉक्टर असलेल्या रायमुलकर यांचे देव सध्या पाण्यात आहेत. सर्वोच्च न्यायालय आता बंडखोरीवर काय उपचार करते, हे काही तासातच समोर येईल.

या 16 आमदारांच्या पात्रतेवर होणार निर्णय राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल गुरुवारी सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे. या निकालात 16 आमदार अपात्र होणार की नाही, याचाही निकाल सर्वोच्च न्यायालय देणार आहे. या सोहळा आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, संजय शिरसाट, तानाजी सावंत, यामिनी जाधव, चिमणराव पाटील, भरत गोगावले, लता सोनावणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, रमेश बोरणारे आणि बालाजी कल्याणकर यांचा समावेश आहे.

जाधव यांच्या नंतर रायमुलकर मेहकर विधानसभा मतदारसंघ अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या कित्येक वर्षांपासून या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकत आहे. सध्याचे जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव हे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होते. त्यांनी एकखांबी या मतदारसंघात शिवसेनेची सत्ता टिकवली होती. त्यानंतर हा मतदारसंघ राखीव झाला. जाधव यांचा आमदार की सुटून खासदारकीचा प्रवास सुरु झाला.  त्यानंतर डॉक्टर रायमुलकर यांच्या खांद्यावर या मतदारसंघाची धूरा आली आहे.

हे सुद्धा वाचा

घाटावर शिवसेनेचा वरचष्मा बुलडाणा जिल्ह्यात घाटावर आणि घाटाखाली अशी विभागणी आहे. घाटावर बुलडाणा, मेहकर विधानसभा मतदारसंघात सध्या शिवसेनेचे आमदार आहेत. संजय गायकवाड आणि संजय रायमुलकर या दोघांनी शिंदे गटात नशीब आजमावले आहेत. चिखली मतदारसंघात भाजपची पकड कायम आहे. घाटाखाली भाजपचा वरचष्मा आहे. याभागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा प्रभाव आहे. बुलडाणा जिल्ह्यातील अनेक बँका, शैक्षणिक संस्थांवर त्यांची मजबूत पकड आहे. सध्या जिल्ह्यात शिवसेनेत पडलेल्या दोन खेम्यामुळे भाजपला कितपत फायदा होतो ते समोर येईल.

निर्णयानंतर समीकरणे बदलतील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर समीकरणे बदलतील. हा निकाल काही येवो. जिल्ह्यात राजकीय समीकरणे बदलतील. मोठा उलटफेर दिसून येईल. कार्यकर्ते त्यांचे नेते बदलवू शकतात. तसेच पक्षांतर ही घडेल. हा निर्णय बुलडाणा जिल्ह्यासाठी महत्वाचा आहे. कारण दोन आमदार आणि एक खासदार शिंदे गटासोबत आहेत. निकालाचे परिणाम जिल्ह्यात मोठा उलटफेर करतील, हे निश्चित.

'छावा' पाहून पसरली अफवा अन् औरंगजेबाचा खजिना लुटण्यासाठी झुंबड
'छावा' पाहून पसरली अफवा अन् औरंगजेबाचा खजिना लुटण्यासाठी झुंबड.
हरिणाच्या मटणासाठी मारहाण, धसांचा कार्यकर्ता 'खोक्या'ची दहशत; काय घडल?
हरिणाच्या मटणासाठी मारहाण, धसांचा कार्यकर्ता 'खोक्या'ची दहशत; काय घडल?.
अश्लील चाळे करणाऱ्याचे वडील म्हणाले; लाज वाटते, त्याने लघुशंका माझ्या
अश्लील चाळे करणाऱ्याचे वडील म्हणाले; लाज वाटते, त्याने लघुशंका माझ्या.
'भुजबळ सडलेल्या डोक्याचा, तो स्वप्न बघून मरेल पण...', जरांगेंनी डिवचलं
'भुजबळ सडलेल्या डोक्याचा, तो स्वप्न बघून मरेल पण...', जरांगेंनी डिवचलं.
पुण्यातील या घटनांमुळे संताप! कुठे अश्लील चाळे,कोयत्यानं हल्ला तर कुठे
पुण्यातील या घटनांमुळे संताप! कुठे अश्लील चाळे,कोयत्यानं हल्ला तर कुठे.
'त्या' प्रकारावरून रूपाली ठोंबरे आक्रमक, 'जसं काय त्याच्या बापाचा...'
'त्या' प्रकारावरून रूपाली ठोंबरे आक्रमक, 'जसं काय त्याच्या बापाचा...'.
पुण्यातील तरूणाच्या अश्लील चाळ्यांवरून वसंत मोरे पोलिसांवरच भडकले
पुण्यातील तरूणाच्या अश्लील चाळ्यांवरून वसंत मोरे पोलिसांवरच भडकले.
'टूरिस्ट म्हणून येतात अन्...', एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका
'टूरिस्ट म्हणून येतात अन्...', एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका.
बड्या बापाच्या लेकाचे भरचौकात अश्लील चाळे, BMW त बसून स्त्रियांसमोरच..
बड्या बापाच्या लेकाचे भरचौकात अश्लील चाळे, BMW त बसून स्त्रियांसमोरच...
पंकजा मुडेंचं रडगाणं, वादग्रस्त वक्तव्यांचा सपाटा,वडेट्टीवारांचा टोला
पंकजा मुडेंचं रडगाणं, वादग्रस्त वक्तव्यांचा सपाटा,वडेट्टीवारांचा टोला.