सुप्रिया सुळे यांनी आपलं मत व्यक्त केलं, मनीषा कायंदे यांची प्रतिक्रिया काय?
प्रबोधनकार आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू एकत्र आलेत.
मुंबई – महाराष्ट्रात स्त्रीला स्वातंत्र्य आहे की, नाही असा सवाल ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातही मुस्लीम महिला राहत होत्या. परंतु, छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधी कपाळावर टीकली लावावी की, नाही. वेशभूषा कोणती करावी, हे सर्व स्वातंत्र्य होते. हिंदू संस्कृतीत अनेक पुरुष कपाळावर टीळा लावतात.
संभाजी भिडे गुरुजी यांनी पुरुषांना असा प्रश्न विचारावा की, तुमच्या कपाळावर टीळा का नाही आहे. विनाकारण लोकांमध्ये भांडण लावायची कामं करू नये, असंही मनीषा कायंदे म्हणाल्या. संभाजी गुरुजी यांच्या अक्शनला सुप्रिया सुळे यांनी रिएक्शन दिलंय. सुळे यांनी त्यांचं मत व्यक्त केलं.
तुम्हाला पाश्चात्यकरण नको असल्यास सगळ्या महिलांनी साड्या घातल्या पाहिजे ना, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मग, सर्व पुरुषांना धोतर आणि सदरा घातला पाहिजे. त्यामुळं हा सर्व वाद निरर्थक आहे.
देशात महिलांवर अन्याय अत्याचार होतो. त्यावर कोणी बोलत नाही. त्यावर कोणी आंदोलन करत नाही. बेरोजगारी व महागाईवर किती आंदोलनं होत आहेत. सुप्रिया सुळे या खासदार आहेत. संभाजी गुरुजी यांनी अट मांडली होती. पण, सुप्रिया सुळे यांनी आपलं मत व्यक्त केलं, असं त्यांनी सांगितलं.
तुषार गांधी हे महात्मा गांधी यांचे पणतू आहेत. त्यांची माहिती ही खरी की खोटी याची शहानिशा करावी. न्यायालयानं शहानिशा करावी. त्यांच्याकडील उपलब्ध माहितीवर ते बोलले असतील.
प्रबोधनकार आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू एकत्र आलेत. शिवसेना ठाकरे गट व प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी एकत्र निवडणूक लढणार आहे. देशात लोकशाहीची हत्या सुरू आहे. देशात दभंगगिरी सुरू आहे. नोटबंदी करा, वाट्टेल तसा जीएसटी लावा. तरी लोकं निद्रीतावस्थेत आहेत. यातून लोकांना बाहेर काढावं लागेल. याचं काम प्रकाश आंबेडकर करत असतील, तर लोकं त्याचं स्वागत करतील, असंही मनीषा कायंदे यांनी सांगितलं.