पवार साहेबांनी सर्वांना वेदनादायी देणारा निर्णय घेतला; पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरुच राहणार…
शरद पवार यांच्या निर्णयामुळे मी माझ्या महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदाचा आज राजीनामा अध्यक्ष यांच्याकडे पाठवून दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.
सांगली : राज्यातील राजकीय वातावरण वेगवेगळ्या घटनांनी ढवळून निघालेले असतानाच राष्ट्र्वादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे आता आणखी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष पदावरून आणि राजकीय निवृत्तीची घोषणा केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीही राजीनामा देण्याचे सत्र चालू केले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता नवाच वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. एकीकडे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदाचा सांगलीच्या सुरेश पाटील यांनी राजीनामा दिला आहे तर दुसरीकडे अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा अथवा आंदोलन करू नये असे आवाहन केले होते.
त्यांच्या या आवाहनानंतरही सांगलीचे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचा उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.
शरद पवार यांच्या निर्णयानंतर सांगलीमध्ये सुरेश पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.
शरद पवार यांनी अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा जो निर्णय घेतला आहे तो चुकीचा असल्याचे सांगत त्यांच्या या निर्णयानंतर कार्यकर्ते नाराज झाल्याचेही सुरेश पाटील यांनी सांगितले. त्यांच्या या निर्णत्यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादीमध्ये चांगलेच वातावरण चिघळले आहे.
शरद पवार यांच्या निर्णयानंतर आता सांगली जिल्ह्यातील महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचा उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी त्यांच्या या पदाचा राजीनामा दिला आहे.
सुरेश पाटील यांनी शरद पवार यांच्या निर्णयावर बोलताना ते म्हणाले की, शरद पवार यांनी सर्वांना वेदनादायी देणारा आणि धक्कादायक निर्णय घेतलेला आहे.
गेली 40 वर्षे शरद पवार यांना आदर्श मानून त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृ्त्त्वाखाली मी राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
आज शरद पवार यांनी जो निर्णय घेतला आहे, तो आमच्या सर्वांच्या मनाला अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायकच आहे अशी भावूक प्रतिक्रियाही व्यक्त केली.
शरद पवार यांच्या निर्णयामुळे मी माझ्या महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदाचा आज राजीनामा अध्यक्ष यांच्याकडे पाठवून दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.
शरद पवार यांच्या या निर्णयामुळे आम्ही आमच्या पदाचा राजीनामा देत असून त्यांनी घेतलेला निर्णय बदलावा असंही मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.