देवेंद्रभाऊ म्हणतात शिल्लक सेना आहे, हो आहे; सुषमा अंधारेंनी थेट उत्तरच दिलं….
चित्रपटाविषयी आमदार जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल होतो ही दुर्देव्याची बाब असल्याचे टीकाही त्यांनी राज्य सरकारवर केली आहे.
मुंबईः ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या राजकारणामुळे आता प्रचंड मोठ्या हालचालींना वेग आला आहे. त्यातच ठाकरे गटातील कीर्तीकरानंतर बालाजी किणीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे-शिंदे वाद पु्न्हा तापला आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्या म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस म्हणतात शिल्लक सेना आहे..हो आहे आमची शिल्लक सेना म्हणत त्यांनी सगळे बेईमान पळून गेले असल्यानेच आमची शिल्लक सेना असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या की, जे देवेंद्र भाऊ म्हणतात, द्वेष संपला पाहिजे. तेच वातावरण गढूळ करतात असा निशाणाही त्यांनी त्यांच्यावर साधला.
‘हर हर महादेव’ या चित्रपटावरुन चाललेल्या राजकारणावरुनह त्यांनी भाजपवर टीका केली. त्यांनीच इतिहास विकृत केला आणि इतिहासाची मोडतोड केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
हर हर महादेव चित्रपटात इतिहासाची मोडतोड केली आहे. मराठा समाजाचं विकृत चित्रण केलं गेलं आहे. चित्रपटाबाबत जितेंद्र आव्हाडांची बाजू बरोबर होती, मात्र राज ठाकरेंनी संहिता वाचली नाही का? न वाचता व्हॉईस ओव्हर कसा दिला? असा सवाल त्यांनी राज ठाकरेंना केला आहे.
चित्रपटाविषयी आमदार जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल होतो ही दुर्देव्याची बाब असल्याचे टीकाही त्यांनी राज्य सरकारवर केली आहे.
पुलाचे उद्घाटन करताना जितेंद्र आव्हाड यांचे समर्थकांनी त्यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आणि त्याचाच राग श्रीकांत शिंदेंना आहे. नया नया खून है.. ज्यादा उछलता है त्यामुळे त्यांच्याकडून टीका केली जात आहे असंही त्यांनी सांगितले.
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप करण्यात आल्यानंतर त्यांनी आरोप करणाऱ्या महिलांवरही त्यांनी निशाणा साधला. आरोप करणाऱ्या त्याच महिला आहेत.
ज्या मध्यंतरी एका मंदिरासमोर कांगावा करत होत्या अशी टीकाही त्यांनी केली. ज्यांनी आरोप केले आहेत त्यांना जितेंद्र आव्हाड ताई बाजूला व्हा आणि हात लावतात त्यामुळे विनयभंगाचा गुन्हा दाखल होतो.
या प्रकरणासाठी मुख्यमंत्री मात्र तत्परता दाखवतात, आणि त्या प्रकरणाला गृहमंत्री ग्रीन सिग्नल देतात असं म्हणत त्यांनी अब्दुल सत्तार, गुलाब पाटील यांच्यावर गुन्हा का दाखल होत नाही देवेंद्रभाऊ? असा सवालही त्यांनी केली आहे.