“देवेंद्रजींच्याच अधिपत्याखाली छत्रपतींच्या अपमानाचे षडयंत्र”; अंधारेंनी तोफ डागली
देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल प्रचंड आकस आणि द्वेष आहे. त्यामुळेच छत्रपतींचा अपमान होत असताना देवेंद्र फडणवीस एक शब्दही काढत नाहीत.
कल्याणः महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. त्यातच ठाकरे गटाने आता महत्वाच्या शहरांमधून आणि अनेक जिल्ह्यांमधून महाप्रबोधन यात्रा काढण्यास सुरुवात केली आहे. या महाप्रबोधन यात्रेत ठाकरे गटाची तोफ समजल्या जाणाऱ्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याकडून सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला जातो आहे. त्यातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात सुषमा अंधारे यांनी सभा घेऊन त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढविला आहे.
राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या नेत्यांवरून त्यांना लक्ष्य करण्यात आले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपालांसह अनेकांनी बेताल वक्तव्य केली आहेत ती देवेंद्र फडणवीस यांच्याच अधिपत्याखाली केली जात असल्याचा त्यांच्यावर घणाघात करण्यात आला.
यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रमधील महापुरुषांचा अवमान होत असताना देवेंद्रजी जाणीवपूर्वक आळी निळी चिडीचूप होऊन बसले आहेत. याचा अर्थच असा आहे की देवेंद्रजी फडणवीस यांच्या अधिपत्याखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगमनाचे षड्यंत्र आखलं जात असल्याची टीका त्यांच्यावर करण्यात आली.
देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल प्रचंड आकस आणि द्वेष आहे. त्यामुळेच छत्रपतींचा अपमान होत असताना देवेंद्र फडणवीस एक शब्दही काढत नाहीत असा त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.
कल्याणमधील पलावा सिटी, मंगल प्रभात रोड आणि उभी केली त्याचे शेअर कोणाकोणाला दिले आहेत. ते एकदा विचारून घ्या. कारण माझ्याकडे त्याचे कागदपत्र असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
त्याचे शेअर पोचल्यामुळेच मंगलप्रभात लोढा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतो, तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चकार शब्द काढत नाहीत कारण आपणा काम बनता भाड मे जाये जनता उनको क्या है असं म्हणत त्यांनी मुख्यंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांवरही त्यांनी जोरदा हल्लाबोल केला आहे.