ऊठ दुपारी अन् घे सुपारी असा आमच्याकडे एक पठ्ठ्या आहे, सुषमा अंधारे असं का म्हणाल्या?; कुणाला म्हणाल्या?

मनसे धारावी पॅटनबाबत का बोलत नाही? अंगावर केस नसली तरी काही फरक पडत नाही. फक्त वाया गेलेली केस असू नये, असा हल्लाही त्यांनी राज ठाकरेंवर नाव न घेता चढवला.

ऊठ दुपारी अन् घे सुपारी असा आमच्याकडे एक पठ्ठ्या आहे, सुषमा अंधारे असं का म्हणाल्या?; कुणाला म्हणाल्या?
ऊठ दुपारी अन् घे सुपारी असा आमच्याकडे एक पठ्ठ्या आहे, सुषमा अंधारे असं का म्हणाल्या?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 02, 2022 | 10:29 AM

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मिमिक्री केली. उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावरून त्यांना डिवचलंही. तसेच आपण केलेली आजवरची सर्व आंदोलने यशस्वी झाली आहेत. इतर पक्षांपेक्षा आपल्या आंदोलनाच्या यशाचा रेट सर्वाधिक आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांना डिवचले आहे. ऊठ दुपारी अन् घे सुपारी असा आमच्याकडे एक पठ्ठ्या आहे, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवली.

मुलुंडमध्ये काल महाप्रबोधन यात्रा पार पडली. यावेळी सुषमा अंधारे यांनी आपल्या खणखणीत भाषणातून राज ठाकरे यांचा समाचार घेतानाच त्यांच्या आंदोलनाची खिल्लीही उडवली. राज ठाकरे यांचे टोलचे आंदोलन म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला असं होतं. सब मॅनेज किया. वडापाव गाडी, गरीबांवर जोर जबर दाखवत आहेत. पण इमारतीत व्यवसाय करणाऱ्यांवर कधी जोर दाखवणार? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.

हे सुद्धा वाचा

मनसे धारावी पॅटनबाबत का बोलत नाही? अंगावर केस नसली तरी काही फरक पडत नाही. फक्त वाया गेलेली केस असू नये, असा हल्लाही त्यांनी राज ठाकरेंवर नाव न घेता चढवला. उद्धव ठाकरे यांच्या आजारावर कोणी नाटक करत असेल तर त्याला चक्र व्याजा सकट उत्तर दिले जाईल, असा इशाराच त्यांनी दिला.

यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. महिलांचे प्रश्न ऐरणीवर असताना देखील देवेंद्र फडणवीस लक्ष घालत नाही. त्यावेळी तुमच्या पदाचा राजीनामा देऊन तुम्ही घरी बसा, अशी टीका त्यांनी केली.

ईडीचा दुरुपयोग करून एक एक पक्ष संपवला जात आहे. भाजपला शिवसेना नाहीतर सर्व पक्ष संपवायचे आहेत. विरोधी पक्ष संपला तर काहीच राहणार नाही. सत्तेसाठी शिवसेनेने हट्ट केला नाही, तर आम्ही आकांडतांडव केलं असतं. शिवसेना लढणार आणि लढत राहणार. प्रबोधनकार यांची साक्ष आहे, असंही त्या म्हणाल्या.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.