Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | ST कर्मचाऱ्यांचं निलंबन कशाला?

जाहिरातीवरुन एसटीची प्रतिमा खराब झाल्याच्या आरोपात ३ कर्मचाऱ्यांचं निलंबन झालंय. यावरुन जखम डोक्याला आणि इलाज पायाला अशी टीका करत विरोधकांनी निलंबनाच्या कारवाईला चुकीचं ठरवलंय.

Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | ST कर्मचाऱ्यांचं निलंबन कशाला?
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 12:18 AM

मुंबई | काचा तुटलेल्या एसटीवर सरकारनं विकासाची जाहिरात छापली. विरोधकांनी त्यावरुन सभागृहात टीकेची झोड उठवली. यावरुन ज्या डेपोतून ही एसटी निघाली होती. तिथल्या ३ एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन झालं. त्यावर सदाभाऊ आणि सदावर्ते म्हणतायत की अजित पवारांमुळे कर्मचारी निलंबित झाले आहेत. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी जाहिरातीवर उत्तर दिलंय. मात्र निलंबनावर ते बोलले नाहीत.

काचा तुटलेल्या एसटीवरच्या जाहिरातीवरुन सरकार टीकेचं धनी बनलं. मात्र याच जाहिरातीवरुन एसटीची प्रतिमा खराब झाल्याच्या आरोपात ३ कर्मचाऱ्यांचं निलंबन झालंय. यावरुन जखम डोक्याला आणि इलाज पायाला अशी टीका करत विरोधकांनी निलंबनाच्या कारवाईला चुकीचं ठरवलंय.

व्हायरल झालेली MH-20 BL- 0206 एसटी धाराशीवच्या भूम आगारातली आहे. याप्रकरणी वाहन परीक्षक डी. बी.‎ एडके, एस. एन. हराळ आणि ए. यु.शेख‎ या ३ कर्मचाऱ्यांचं निलंबन झालंय. निलंबित कर्मचाऱ्यांची बाजू काय आहे. याआधी एसटी डेपोची यंत्रणा समजून घेऊयात.

चालक-वाहक-डेपो मॅनेजर यांचं काम बस चालवणं आणि वेळापत्रक ठरवण्याचं असतं. दुसऱ्या बाजूला दुरुस्ती आगारात सहाय्यक कार्यशाळा अध्यक्ष, वाहन पर्यवेक्षक, मेकॅनिकल विभाग येतो. सहाय्यक कार्यशाळा प्रमुखांकडे गाडी दुरुस्तीची जबाबदारी असते. तर वाहन पर्यवेक्षकांकडे तिच्या परीक्षणाची जबाबदारी असते. या दोन्हीं घटकांच्या सहमतीनंतर एसटी दुरुस्ती आगारातून प्रत्यक्ष एसटी स्थानकावर येऊन प्रवासाला निघते.

आता विषय उरतो एसटीवरच्या जाहिरातीला. सरकारच्या कामांच्या जाहिरातीसाठी वेगवेगळ्या कंपन्या नेमल्या जातात. माहितीनुसार एसटीवरच्या जाहिरातीचं कंत्राट मुंबईतल्या प्रो ऍक्टिव्ह नावाच्या कंपनीकडे आहे. या कंपनीनं इतर उपकंपन्यांना जाहिरात चिकटवण्याचं कंत्राट दिलंय. आणि त्यापैकीच एका कंपनीतल्या लोकांनी भूम डेपोतल्या एसटीवर जाहिरात चिकवटलीय. त्यांची बाजू काय हे जाणून घेण्यासाठी अद्याप जाहिरात चिकटवणाऱ्या कंपनीशी आमचा संपर्क होऊ शकलेला नाही.

जेव्हा गाड्यांची कमतरता भासते, तेव्हा डेपो मॅनेजर दुरुस्ती विभागाला विनंती करुन बस सोडतात. जी बस निलंबनाचं कारण ठरलीय. अशा अनेक दुरावस्थेतल्या बस कार्यान्वित आहेत. मात्र फक्त या बसचा फोटो व्हायरल झाल्यामुळे हा मुद्दा चर्चेत आलाय. शिवाय दहावी-बारावीच्या परीक्षांमुळे बसेसची गरज भासल्यामुळेच बस सोडण्यात आली. आम्ही कोणतीही जाहिरात न चिकटवता निलंबन का, असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी केलाय.

दैनिक भास्करच्या माहितीनुसार भूम आगारात ६८ बस आहेत. त्यापैकी लांब पल्ल्यांसाठी 26, मध्यम पल्ल्याच्या 4, ऑडनरी 15, शटल सेवा 7 आणि हैद्राबादसाठी 2 अशा गाड्या धावतात. पण अनेक बस कालबाह्य आणि दुरावस्थेत असूनही त्या रस्त्यांवर धावतायत.

विशेष म्हणजे ज्यादिवशी हा फोटो व्हायरल झाला, त्याच्या दुसऱ्या दिवशी भूम डेपोतल्या इतर खराब बस दुरुस्तीसाठी पाठवल्या गेल्या. पण तो फोटो अधिवेशनात गाजल्यामुळे ३ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड पडली. खराब एसटीवर जाहिरात चिकटवण्याची परवानगी देणारे अधिकारी आणि जाहिरात चिकटवणारे कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई का नको, असाही प्रश्न कर्चचाऱ्यांकडून उपस्थित होतोय.

महाराष्ट्रातल्या एसटी आगारांमध्ये असंख्य गाड्या खराब अवस्थेतही धावतायत. हे एसटी संपावेळी सदाभाऊ खोतही म्हणत होते. ज्या डेपोनं निलंबन केलं त्यांचं म्हणणं आहे की संबंधित कर्मचाऱ्यांनी एसटीची प्रतिमा खराब केली. विरोधक म्हणतायत की खराब एसट्या स्कॅब करण्याऐवजी त्यावर जाहिरीतींद्वारे सरकार पैसा खर्च करतंय. सरकार म्हणतंय की आमची जाहिरात ही याआधीच्या सरकारपेक्षा जास्त सर्वसमावेशक आहे. प्रतिमा, एसटीची दुरावस्था आणि जाहिरात या ३ मुद्द्यांच्या वादात मात्र ३ कर्मचाऱ्यांचं निलंबन होऊन बसलंय.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.