Breaking | मुंबईत धोकादायक, संशयास्पद व्यक्ती फिरतेय, NIA चा पोलिसांना मेल, काय घडतंय?

आगामी सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना अधिक सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Breaking | मुंबईत धोकादायक, संशयास्पद व्यक्ती फिरतेय, NIA चा पोलिसांना मेल, काय घडतंय?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Feb 27, 2023 | 1:46 PM

मुंबई : मुंबई (Mumbai Alert) आणि महाराष्ट्राची काळजी वाढवणारी बातमी हाती आली आहे. मुंबईत एक संशयास्पद (Suspicious) व्यक्ती फिरत असल्याचा इशारा पोलिसांना देण्यात आला आहे. ही संशयास्पद व्यक्ती धोकादायक ठरू शकते, अशा आशयाचा ईमेल NIA अर्थात नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीजतर्फे मुंबई पोलिसांना पाठवण्यात आला आहे. सरफराज मेमन असं या व्यक्तीचं नाव असल्याचंही मेलमध्ये सांगण्यात आलं आहे. मुंबईत घातपात घडवण्यासाठी तर ही व्यक्ती उपनगरांतून फिरत नाही ना, असा संशय NIA ला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांना ताबडतोब सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

इंदूरहून मुंबईत…

मुंबईत फिरत असलेली ही संशयित व्यक्ती मूळची इंदूर येथील राहणारी असल्याचं NIA ने पाठवलेल्या ईमेलमध्ये सांगण्यात आलंय. तसेच या व्यक्तीने चीन, हाँगकाँग आणि पाकिस्तानमध्ये दहशवादी कारवायांचं प्रशिक्षण घेतल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे मुंबईसाठी ही व्यक्ती धोकादायक ठरू शकते, असा इशारा NIA ने दिला आहे. संशयित व्यक्तीसंबंधी काही कागदपत्रही NIA ने मुंबई पोलिसांना पाठवले आहेत. यात सदर व्यक्तीचं आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स आणि एलसी कॉपीही जोडण्यात आल्या आहेत. NIA मुंबई तसेच इंदूर पोलिसांशी संपर्क साधून ही माहिती दिली आहे.

सुरक्षा यंत्रणेत वाढ

NIA ने पाठवलेल्या ईमेलनंतर मुंबईतील सरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आली आहे. मुंबईतील प्रमुख रस्त्यांवर येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. तसेच शहरातील प्रमुख धार्मिक स्थळे, पंचतारांकित हॉटेल, महत्त्वाची शासकीय कार्यालयं यठिकाणी कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर खबरदारी

आगामी सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना अधिक सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आगामी महिन्यात होळी तसेच गुढीपाडव्याचा सण आहे. तसेच राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काही दिग्गज नेत्यांचे दौरेही आयोजित करण्यात आले आहेत. या घडामोडी लक्षात घेता सर्वच संवेदनशील ठिकाणांवर करडी नजर ठेवण्यात यावी, असे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.