“शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे अयोध्या दौऱ्यावर”; या नेत्याची सडकून टीका…

आजच्या घडीला राज्यातील शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे असतानाही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे सरकार अयोध्येला गेलेले आहे असा घणाघात त्यांनी केला आहे.

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे अयोध्या दौऱ्यावर; या नेत्याची सडकून टीका...
Follow us
| Updated on: Apr 09, 2023 | 10:08 PM

मुंबईः राज्यातील शेतकरी अवकाळी आणि गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीमुळे संकटात आहे. हातातोंडाशी आलेली पिकं वाया गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अशा अवस्थेत राज्यातील जनतेला सरकारची गरज असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अवकाळीचा फटका बसलेला असतानाच अयोध्यच्या दौऱ्यावर गेल्याने आता विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. महाराष्ट्रातील शेतकरी अवकाळी आणि गारपीटीनं उद्धवस्त झाला आहे.

त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापला आहे. भाजीपाला, गहू, मका, कलिंगड अशी पीकं अवकाळीच्या तावडीत सापडल्याने आता शेतकऱ्यांनी जगायचा कसा असा प्रश्न पडला आहे.

शेतकऱ्यांची अवस्था वाईट असतानाही मुख्यमंत्री काही आमदारांना घेऊन अयोध्या दौऱ्यावर गेले आहे. त्यामुळे आता विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे.

मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पावसातही शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळण्याआधीच आता पुन्हा गारपीट झाल्यामुळे शेतीच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना त्यांनी सरकारकडून अजून पंचनामे झाले नाहीत. त्यामुळे हे पंचनामे कधी होणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

तर मागील वर्षी झालेल्या नुकसानीचे म्हणजेच सप्टेंबर ऑक्टोंबरमधील मदत अजून मिळाली नाही, तरीही हे सरकार अयोध्येच्या दौऱ्यामध्ये मश्गूल असल्याची टी्काही त्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांची अशी अवस्था असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. हे अयोध्याचा दर्शन उशिरानंही घेता आलं असतं अशी जोरदार टीका रविकांत तुपकर यांनी केली आहे.

आजच्या घडीला राज्यातील शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे असतानाही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे सरकार अयोध्येला गेलेले आहे असा घणाघात त्यांनी केला आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.