तारणहार! निवृत्त कर्नलचा जीव वाचवण्यासाठी Swiggy Delivery Boyने जे केलं, त्याला तोडच नाही

Swiggy Delivery boy Saved life : स्विगीच्या एका डिलिव्हरी बॉयनं हा सगळा प्रकार पाहिला. आपल्या हातातलं काम बाजूला ठेवून तो निवृत्त कर्नल मलिक यांचा जीव वाचवण्यासाठी आत्मीयतेनं धावला. या स्विगी बॉयचं नाव आहे मृणाल किरदत.

तारणहार! निवृत्त कर्नलचा जीव वाचवण्यासाठी Swiggy Delivery Boyने जे केलं, त्याला तोडच नाही
स्विगी डिलीव्हरी बॉयनं वाचवले निवृत्त कर्नलचे प्राण
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 8:16 PM

मुंबई : मुंबई आणि मुंबईचं ट्रॅफिक (Mumbai Traffic) याबद्दल नव्यानं काहीतरी सांगायला हवं, असं काहीही नाही. एकदा का ट्रॅफिकमध्ये अडकलो, की त्यातून सुटायचा काहीही नेम नसतोच. अशाच ट्रॅफिकमध्ये एकाही रुग्णवाहिका अडकली तर काय होईल, याची कल्पनाही करवत नाही! मुंबईकरांचं स्पिरीट (Spirit of Mumbai) आणि मुंबईकरांची दर्यादिली सिद्ध करणारी एक जबरदस्त घटना समोर आली आहे. ख्रिसमसच्या दिवशी म्हणजेच 25 डिसेंबर 2021 रोजी घडलेल्या या घटनेबाबत आता खुलासा झाला असून एक स्विगी बॉयच्या (Swiggy delivery Boy) मदतीमुळे एका निवृत्त कर्नलचा जीव थोडक्यात बचावला आहे. खुद्द स्विगीनंच याबाबत इन्स्टाग्रावरुन पोस्ट करत माहिती दिली आहे. अस्वस्थ वाटू लागलं म्हणून निवृत्त कर्नलच्या मुलानं त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी कार काढली. कारमधून जात असताना मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये ते अडकले! आता रुग्णालय कसं गाठायचं, असा प्रश्न कर्नल आणि त्यांच्या मुलापुढे उभा राहिला होता. पण अखेर देवासारखा एक माणूस दुचाकीवरुन आला आणि याच माणसामुळे निवृत्त कर्नलचे प्राण थोडक्याच वाचले!

स्विगी डिलीव्हरी बॉय नव्हे हा तर देवदूत!

काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, असं या घटनेतून बचावल्यानंतर निवृत्त कर्नल यांना वाटलं असणार, हे नक्की! पण जीव वाचण्याआधी कर्नल यांच्यासोबत जे घडलं ते एका चमत्कारापेक्षा कमी नव्हतं. प्रचंड ट्रॅफिकमध्ये निवृत्त कर्नल अडकले. मुलगा त्यांना रुग्णालयात घेऊन जात होता. जीव वर-खाली होत होता. अस्वस्थपणानं नकोसं केलं होतं. निवृत्त कर्नल मोहन मलिक यांचा काहीच सुचेनासं झालं होतं. आपल्या वडिलांना आता रुग्णालयात कसं पोहोचवायचं, असा प्रश्न निवृत्त कर्नल यांच्या मुलाला ट्रॅफिक पाहून पडला होता.

अशावेळी अखेर कर्नल मलिक यांचं मुलगा एखादी दुचाकी थांबवून आपल्याला मदत करेल, या भावनेनं खाली उतरला. बाईकला थांबवण्याचा प्रयत्न मलिक यांचा मुलगा करत होता. पण कुणीच थांबायला तयार होईना!

माणूसकी जिवंत आहे!

अशातच स्विगीच्या एका डिलिव्हरी बॉयनं हा सगळा प्रकार पाहिला. आपल्या हातातलं काम बाजूला ठेवून तो निवृत्त कर्नल मलिक यांचा जीव वाचवण्यासाठी आत्मीयतेनं धावला. या स्विगी बॉयचं नाव आहे मृणाल किरदत. मृणाल हा स्विगीसाठी काम करत असून तो सांताक्रूझला राहतो. निवृत्त कर्नल मलिक यांची तब्बेत बिघडत चालली असल्याचं पाहून मृणालने त्यांना आपल्या बाईकवर बसवलं आणि थेट लिलावती रुग्णालयात नेलं. ट्रॅफिकमधून कशीबशी वाट काढत, हॉर्न वाजवत तर कधी मोठ्यानं ओरडून लोकांना बाजूला करत मृणालनं वायूवेगानं निवृत्त कर्नल मलिक यांना रुग्णालयात पोहोचवलं. तिथे डॉक्टरांना सांगून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं निदर्शनास आणून दिलं. मृणालच्या या कामगिरीमुळेच निवृत्त कर्नल मलिक यांचा जीव थोडक्यात बचावलाय.

तारणहार!

काही दिवस रुग्णालयात त्यांना ठेवण्यात आलं होतं. डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार घेतल्यानंतर आता निवृत्त कर्नल मलिक हे ठणठणीत बरे झाले असून त्यांनी या स्विगी बॉयचे मनापासून आभार मानले आहेत. स्विगी बॉय मृणाल आज नसता, तर मी माझ्या कुटुंबासोबत नसतो, असंही त्यांनी म्हटलं आहे. मृणाल माझ्यासाठी तारणहार आहे, असं म्हणत त्यांनी मृणालचे आभार मानलेत.

View this post on Instagram

A post shared by Swiggy (@swiggyindia)

स्विगीनं आपल्या इन्स्टाग्रामवरुन ही संपूर्ण घटना शेअर करुन असून आता सोशल मीडियात स्विगी डिलिव्हरी बॉय असलेल्या मृणालचं सर्वच स्तरातून कौतुक होतंय. त्यांनं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका निवृत्त कर्नलचे प्राण वाचले आहेत. इतकंच काय तर माणुसकी अजूनही जिवंत आहे, याचीही प्रचिती या घटनेतून समोर आली आहे.

संबंधित बातम्या :

Mumbai RPF : आरपीएफ ठरतंय जीवरक्षक, मुंबईत वर्षभरात वाचवले 47 जणांचे प्राण

Video: ज्यानं सुपरमॅनसारखं जाऊन मुलाचे प्राण वाचवले, त्या मयूर शेळकेनं कसं शक्य केलं अशक्य?

VIDEO | नाशिक स्टेशनवर पाणी प्यायला उतरला, धावती ट्रेन पकडताना घसरला, पोलिसांनी वाचवले वृद्धाचे प्राण

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.