Tahawwur Rana Arrested | केंद्र आणि पोलिसांशी चर्चा करुन राणाबाबत निर्णय घेणार : अनिल देशमुख

राणाच्या प्रकरणाबाबत काय करायचं, याचा निर्णय केंद्र शासन आणि पोलीस यांच्याशी चर्चा करुन राज्य सरकार घेईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

Tahawwur Rana Arrested | केंद्र आणि पोलिसांशी चर्चा करुन राणाबाबत निर्णय घेणार : अनिल देशमुख
| Updated on: Jun 20, 2020 | 8:19 PM

मुंबई : 26/11 च्या हल्ल्यातील मास्टरमाइंड डेव्हिड हेडलीने (Tahawwur Rana Arrested In America) सांगितले होते की, हेडली तहव्वूर राणाचा एजंट म्हणून मुंबईत काम करत होता. राणाच्या प्रकरणाबाबत काय करायचं, याचा निर्णय केंद्र शासन आणि पोलीस यांच्याशी चर्चा करुन राज्य सरकार घेईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिली (Tahawwur Rana Arrested In America).

26/11 च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर हुसेन राणाला अमेरिकेत अटक झाल्यानंतर सह्याद्री गेस्ट हाऊस येथे महाराष्ट्रातील गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाराष्ट्र पोलीस अधिकारी यांच्यात तातडीची बैठक झाली. या बैठकीनंतर अनिल देशमुख यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना ही प्रतिक्रिया दिली.

तहव्वूर हुसेन राणाला अमेरिकेत अटक

मुंबईत झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपींपैकी एक तहव्वुर राणा याला अमेरिकेतील लॉस एन्जेलिसमध्ये अटक करण्यात आली. 59 वर्षीय राणाला मुंबई हल्ल्याशी संबंधित एका प्रकरणात 14 वर्षांची शिक्षा झाली होती. अमेरिकेतही त्याला दहशतवादी गटांना पाठिंबा दिल्याप्रकरणी 10 वर्षांची शिक्षा झाली होती. मात्र, त्याची तब्येत खराब असल्याने मागील आठवड्यात लॉस एन्जेलिसच्या तुरुंगातून ठरलेल्या शिक्षेपेक्षा आधीच सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, दोन दिवसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेण्यात आलं (Tahawwur Rana Arrested In America).

तहव्वूर राणाला भारतात आणण्याची शक्यता

तहव्वुर राणाला सोडल्यानंतर दोनच दिवसात अटक करुन पुन्हा ताब्यात घेण्यात आले. आता त्याला भारताच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची शक्यता आहे. भारताने मुंबई हल्ल्याप्रकरणी याआधीच अमेरिकेकडे प्रत्यर्पणाची मागणी केली होती. याबाबतचं प्रकरण अमेरिकेत अद्याप प्रलंबितच आहे. त्यामुळे अमेरिका राणाला भारताकडे सोपवण्याचा निर्णय घेऊ शकतो.

Tahawwur Rana Arrested In America

संबंधित बातम्या :

20 सैन्य ही संख्या कमी नाही, लष्करप्रमुख, संरक्षण मंत्री किंवा पंतप्रधानांनी उत्तर द्यावं : जितेंद्र आव्हाड

मी पक्ष सोडला म्हणून थोरातांना पद, गांधी-नेहरु सोडून ते ‘मातोश्री’चे उंबरठे झिजवतात : राधाकृष्ण विखे पाटील