मुख्यमंत्री हे ज्योतिषाकडं गेल्याची चर्चा, यावर एकनाथ शिंदे म्हणतात, आम्ही ३० जूनलाच…

सरकारचे प्रमुख देव-धर्म तंत्र, मंत्र, ज्योतिष यामध्ये अडकले. त्यामुळं गुजरात, कर्नाटक या राज्यातून महाराष्ट्रावर हल्ले होतात.

मुख्यमंत्री हे ज्योतिषाकडं गेल्याची चर्चा, यावर एकनाथ शिंदे म्हणतात, आम्ही ३० जूनलाच...
एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Nov 24, 2022 | 10:55 PM

 मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सिन्नरमधील मंदिरात गेले होते. शिंदे हे भविष्य जाणून घेण्यासाठी आले होते, असं अंद्धश्रद्धा निर्मूलन समितीचं म्हणणं आहे. यावरून विरोधकांनी शिंदे यांना घेरलंय. पूजा करायला आमचा विरोध नाही. पण, हे मंदिर ज्योतिष्य सांगण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळं या मंदिरात उद्योग क्षेत्रातील तसेच राजकीय क्षेत्रातील लोकं येत असतात. मुख्यमंत्री शिंदे यांनी तेथे ज्योतिष बघीतल्याची चर्चा आहे. हे खरं असेल तर वेदनाकारक आहे. पुरोगामी महाराष्ट्राला मागे नेणारे आहे. त्यांच्यासोबत शिक्षणमंत्री होते. ते याठिकाणी नेहमी येत असतात. शिक्षणमंत्री अशा ठिकाणी जाणं हे अपमानाची गोष्ट असल्याचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणंय.

बुधवारी मुख्यमंत्री शिंदे हे शिर्डीच्या दौऱ्यावर आले होते. शिंदे यांनी साईबाबांचं दर्शनही घेतलं. पण, त्यानंतर शिंदे हे सिन्नरच्या ईशानेश्वर मंदिरात आले. ज्योतिषी कॅप्टन खरात यांच्याकडून ज्योतिष्य जाणून घेतल्याची चर्चा सुरू झाली.

यावर अजित पवार म्हणाले, ज्योतिष्याकडं जाऊन स्वताचं ज्योतिष्य बघतात, यावर आता काय बोलावं. आमच्यासारखं तर हतबलचं झाले आहेत. २१ व्या शतकात जग चाललेल आहे. तंत्रज्ञानाचं युग आहे. वेगवेगळ्या प्रकारचे बदल होतात.

संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात अत्यंत दुर्बल, कमजोर सरकार अस्तित्वात आलं. सरकारचे प्रमुख  देव-धर्म तंत्र, मंत्र, ज्योतिष यामध्ये अडकले. त्यामुळं गुजरात, कर्नाटक या राज्यातून महाराष्ट्रावर हल्ले होतात.

शरद पवार यांनी सांगितलं की, त्याठिकाणी हात दाखविला असं म्हणतात. त्याची पूर्ण माहिती माझ्याकडं नाही. या सगळ्या गोष्टी आत्मविश्वासाला धक्का बसतो. त्यावेळी अशा गोष्टीकडं वळतात. तशी स्थिती आहे का, अशी शंका मनात येते.

यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोला लगावला. ते म्हणाले, आम्ही ३० जूनलाच हात दाखविला. आत्मविश्वास होता म्हणून ५० आमदार, १३ खासदार माझ्याबरोबर आले. महाविकास आघाडीचं सरकार कुणाचं काम करत होतं. कुणासाठी सरकार चालवित होते, असा टोलाही शिंदे यांनी लगावला. आम्ही ३० जूनला ज्यांना दाखवायचा होता, त्यांना चांगला हात दाखविला असल्याचंही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलं.

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.