मुंबई : टाटा समुहाने मुंबईतील प्लाझ्मा थेरपीसाठी 10 कोटी अर्थ सहाय्य, 20 रुग्णवाहिका आणि 100 व्हेंटिलेटर्स दान केले आहेत (Tata group donation to BMC amid Corona). मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही मदत सुपुर्द करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी टाटा समुहाचे या मदतीसाठी आभार मानले. तसेच कोरोनाशी लढा देताना टाटा समुहासारख्या उद्योग संस्था शासनाच्या खांद्याला खांदा लावून लढा देत आहेत.
उद्धव ठाकरे म्हणाले, “कोरोना सारख्या संकटात अनेक संस्था, व्यक्ती सामाजिक जाणीवेतून पुढे आल्या आहेत. टाटा समुह सुरुवातीपासूनच राज्य शासनाच्या सोबत पूर्ण ताकदीने उभा राहिला आहे. कोरोनाचे संकट संपविण्याच्या जिद्दीने आपण सर्वच उतरलो आहोत. शासनासोबत नागरिक आणि मोठे उद्योजक खांद्याला खांदा लावून लढत आहेत. सर्वच जण अविश्रांत मेहनत करत आहेत. त्यात यश आल्याशिवाय राहणार नाही.”
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी मुंबई मनपा आणि टाटा समुह संयुक्तपणे काम करत आहे. या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्लाझ्मा प्रकल्पांतर्गत टाटा समुहातर्फे महापालिकेला 20 रुग्णवाहिका, 100 व्हेंटिलेटर्स आणि 10 कोटींचे अर्थ सहाय्य मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर आदीही उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत आज टाटा सन्स यांच्याकडून बृहन्मुंबई महानगरपालिकेला २० रुग्णवाहिका, १०० व्हेंटिलेटर्स आणि ₹ १० कोटींचे अर्थसहाय्य सुपूर्द करण्यात आले. यावेळी महापौर @KishoriPednekar, मंत्री @AUThackeray, मंत्री @AslamShaikh_MLA उपस्थित होते. pic.twitter.com/MnGDL5z25G
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 6, 2020
समाजातील प्रत्येक घटक एकत्र येऊन जेव्हा संकटाशी मुकाबला करतो, त्यावेळी यश नक्की मिळते. त्याच जिद्दीने कोरोनाशी लढा देताना टाटा समुहासारख्या उद्योग संस्था शासनाच्या खांद्याला खांदा लावून लढा देत आहेत. आपण कोरोनाच्या लढाईत नक्कीच विजयी होऊ, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, “कोरोना काळात पहिल्या दिवसापासून टाटा समुहाचा मदत कामात सहभाग राहिला आहे. आताही त्यांनी 20 रुग्णवाहिका, 100 व्हेंटिलेटर्स आणि प्लाझ्मा थेरपीसाठी 10 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य दिले. खरं तर हे साहित्य वापरण्याची वेळ येऊ नये, अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो. या मदतीसाठी टाटा समुहाचे आभार.”
कोरोनामुक्त होण्यासाठी निर्भयपणे पावले उचलली जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त होईल, असा विश्वास मंत्री अस्लम शेख यांनी यावळी व्यक्त केला. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
हेही वाचा :
Hotels Lodge Reopening : कंटेन्मेंट झोन वगळता राज्यातील हॉटेल-लॉज सुरु करण्यास परवानगी
‘मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद लावू नये’, वडेट्टीवारांचं नाव न घेता संभाजीराजेंचं प्रत्युत्तर
Maratha Reservation | ठाकरे सरकारने कुठल्याही परिस्थितीत मराठा आरक्षण वाचवावं : देवेंद्र फडणवीस
Tata group donation to BMC amid Corona