शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात कारवाईचे आदेश; 293 उमेदवारावर कारवाई; 7880 उमेदवार परीक्षेतील घोटाळ्यात सहभागी
शिक्षक पात्रता परीक्षा 2019 चा अंतिम निकाल 28 ऑगस्ट 2020 रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार एकूण 16705 उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी काही उमेदवार गैरप्रकारात समाविष्ट असल्याचे स्पष्ट झाले होते.
पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test) संदर्भात कारवाईचे आदेश देण्यात आले असून या प्रकरणातील 293 उमेदवारावर कारवाई (293 Candidate Action) केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. शिक्षक पात्रता परीक्षा 2019 (दि. 19 जानेवारी 2020) च्या परीक्षेमध्ये झालेल्या गैरप्रकारामुळे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यानुसार आता गैरप्रकारामध्ये समाविष्ट असलेल्या उमेदवारांची निवड रद्द (Selection Cancel) करण व शास्ती करणेबाबत. 2019-2020 मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमधील गैरव्यवहारामात सायबर स्टेशन पुण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
त्यानुसार त्याच्या तपासादरम्यान परीक्षार्थींच्या उत्तरपत्रिकांची तपासणी केली असता 7880 उमेदवार परीक्षेतील गैरप्रकारात सहभागी असल्याचे दिसून आले आहे. म्हणजेच परीक्षार्थी परीक्षेला बसूनही त्यांनी गैरप्रकार करून स्वतःस पात्र करून घेतले असल्याचेही सांगण्यात आले आहे.
काही उमेदवार गैरप्रकारात सहभागी
शिक्षक पात्रता परीक्षा 2019 चा अंतिम निकाल 28 ऑगस्ट 2020 रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार एकूण 16705 उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी काही उमेदवार गैरप्रकारात समाविष्ट असल्याचे स्पष्ट झाले होते.
बनावट प्रमाणपत्र प्राप्त
293 उमेदवारांनी आरोपीसोबत बनावट प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले आहे तर उर्वरित 87 उमेदवार हे आरोपींच्या संपर्कात असल्याचे आढळून आले आहे.
निश्चित केलेले आदेश
गैरप्रकारमध्ये सहभागी असलेले परीक्षार्थींच्या विरुद्ध परीक्षा परिषदेने निश्चित केलेली आदेश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व https://mahatet.in या स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. शिक्षण खात्याच्या कारवाईमुळे अनेक जणांवर या कारवाईचा परिणाम होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.