मुंबईत पार्‍याचा कहर, सांताक्रुझचे तापमान 38.7 अंशांवर

ही तापमानवाढ साधारण आठवडाभर कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या संकेतस्थळावर व्यक्त करण्यात आले आहे. (Temperature high in Mumbai, SantaCruz temperature record at 38.7 degrees)

मुंबईत पार्‍याचा कहर, सांताक्रुझचे तापमान 38.7 अंशांवर
दिल्लीकरांना पुढील आठवड्यात करावा लागू शकतो उन्हाचा सामना
Follow us
| Updated on: Mar 25, 2021 | 9:32 PM

मुंबई : राज्यात एकीकडे अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतकर्‍यांना जबर फटका दिला आहे. त्यातच आता मुंबईतील नागरिकांना तापमान वाढीने हैराण केले आहे. कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी जिल्ह्यासह आता मुंबईत उष्णतेची लाट आली आहे. गुरुवारी सलग दुसर्‍या दिवशी सांताक्रुझमध्ये पारा 38 अंशांच्या पुढे झेपावला. त्यामुळे भर दुपारच्या सुमारास कार्यालयात जाण्यासाठी घराबाहेर पडलेले मुंबईकर घामाघूम झाले. ही तापमानवाढ साधारण आठवडाभर कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या संकेतस्थळावर व्यक्त करण्यात आले आहे. (Temperature high in Mumbai, SantaCruz temperature record at 38.7 degrees)

सिंधुदुर्ग, रत्नागिरीचा पारा 39 अंशावर

गुरुवारी सांताक्रुझमध्ये सरासरीपेक्षा 6 अंशांनी अधिक म्हणजेच 38.7 अंश इतक्या विक्रमी कमाल तापमानाची नोंद झाली. मुंबई शहर व उपनगरात अचानक तापमानवाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याचा पारा 39 अंशांवर गेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी गारांसह पाऊसही पडला. मात्र याचवेळी अनेक भागांना उकाड्याने हैराण केले आहे. याचदरम्यान मुंबईत उष्णतेची लाट वाढली आहे. गुरुवारी बोरिवलीत 38.4 अंश, चेंबूरमध्ये 38.7 अंश, कुलाब्यात 36.4 अंश, मुलुंडमध्ये 36.9 अंश, पवईत 35.8 अंश अशी सर्वत्रच तापमानवाढ नोंद झाली. ठाण्यापेक्षा मुंबई शहरात रखरखाट वाढला आहे.

काय म्हणाले हवामान खाते?

मुंबई शहर व उपनगरात पुढील तीन दिवस तापमान 39 अंशांवर जाईल. त्यानंतर 38 आणि 37 अंशांची नोंद होईल. समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे मतलई वारे उशिराने वाहू लागले आहेत. त्यामुळे मुंबई व आसपासच्या परिसरातील उष्णतेत वाढ झाली आहे. मुंबईसह संपूर्ण कोकणपट्ट्यात पुढील साधारण पाच ते सहा दिवस उष्णतेची लाट असेल. त्यामुळे नागरिकांनी उन्हात घराबाहेर पडताना पुरेशी काळजी घ्यावी, असा खबरदारीचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागामार्फत देण्यात आला आहे.

कामाशिवाय भर उन्हात फिरू नका

संपूर्ण राज्यभरात उन्हाचा तडाखा वाढला आहे. उष्णतेची तीव्रता आणखीन वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी भर दुपारच्या सुमारास कामाशिवाय घराबाहेर टाळावे. उन्हातून गॉगल लावा तसेच टोपी घाला किंवा छत्री घेऊनच बाहेर पडा. कडाक्याच्या उन्हात फिरताना चक्कर येऊ शकते. त्यामुळे सोबत पाण्याची बाटलीही ठेवा. अधूनमधून पाणी पित राहा. अन्यथा उष्माघाताचा त्रास होऊ शकतो, असा खबरदारीचा इशारा हवामातज्ज्ञ आणि डॉक्टरांनी दिला आहे. (Temperature high in Mumbai, SantaCruz temperature record at 38.7 degrees)

इतर बातम्या

‘लेटरबॉम्ब’ कट कसा शिजला?; राष्ट्रवादीच्या युवा नेत्याने केला ‘हा’ दावा

हैदराबाद विमानतळावर मिठाईच्या डब्यांची करामत, कोट्यावधीचं घबाड पाहून जवानही चकीत

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.