मुंबई : कोरोनाची स्थिती विदारक बनलेली असतानाच राज्यात सूर्य आग ओकत असल्याचं चित्र निर्माण झालंय. कारण आज राज्यात एकूण 17 जिल्ह्यातील पारा 40 अंशांपेक्षा जास्त नोंदवला गेलाय. यात विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर पुणे, नाशिक आणि मुंबईतही तीव्र उन्हाळा भासत आहे. त्यामुळे कोरोना संकटात तापमान वाढीचाही सामना राज्यातील जनतेला करावा लागत आहे. अशावेळी नागरिकांनी कोरोनासह उन्हापासूनही बचाव करणं गरजेचं बनलंय. (Temperatures above 40 degrees Celsius in many districts of Vidarbha and Marathwada)
अकोला – 42.9
अमरावती – 41.0
बुलडाणा – 40.0
ब्रम्हपुरी – 42.4
चंद्रपूर – 43.2
गडचिरोली – 40.6
गोंदिया – 40.5
नागपूर – 42.0
वर्धा – 42.4
वाशिम – 41.0
यवतमाळ – 41.7
मालेगाव – 41.8
सातारा – 39.0
परभणी – 40.8
बारामती – 38.8
नांदेड – 41.5
सोलापूर – 40.9
कोल्हापूर – 37.8
औरंगाबाद – 39.7
सांगली – 38.3
बीड – 40.7
जेऊर – 40.0
पुणे – 39.1
नाशिक – 39.2
जालना – 39.8
जळगाव – 41.4
मुंबई – 35.8
6 Apr, Higher Max Temp recorded in Mah State today:
Malegaon 41.8 Satara 39 Parbhani 40.8 Baramati 38.8 Nanded 41.5 Slp 40.9
Klp 37.8 A’bad 39.7 Sangli 38.3
Beed 40.7 Jeur 40 Pune 39.1 Nasik 39.2 Jalna 39.8 Jalgaon 41.4 Mumbai 35.8 pic.twitter.com/s5wFva0XQW— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 6, 2021
गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध शहरातील तापमान मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता उष्माघातापासून बचाव करणे अत्यंत आवश्यक झालं आहे. त्यामुळे उष्माघात होऊ नये यासाठी काय करावं, उष्माघाताची लक्षणं काय आणि उष्माघातावर काय उपचार करावा हे माहीत असणे गरजेचं आहे.
उष्माघाताची लक्षणं कशी ओळखाल?
जर कधी तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या कुणामध्ये ही वरील लक्षणं दिसून आली. तर त्याला उष्माघाताचा त्रास होतो आहे हे समजावं आणि त्याला तातडीने उपचार उपलब्ध करुन द्यावी.
उष्माघातापासून बचाव होण्यासाठी काय करावे?
संबंधित बातम्या :
Temperatures above 40 degrees Celsius in many districts of Vidarbha and Marathwada