वस्तूंचा पुरवठा न करताच 428 कोटी रूपयांचं बनावट बिल, राज्य सरकारची मोठी कारवाई

खोटी बिलं देवून सरकारची कोट्यावधी रूपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांविरुद्ध महाराष्ट्र सरकारने कारवाई केलीय.

वस्तूंचा पुरवठा न करताच 428 कोटी रूपयांचं बनावट बिल, राज्य सरकारची मोठी कारवाई
Follow us
| Updated on: Feb 21, 2021 | 12:12 AM

मुंबई : खोटी बिलं देवून सरकारची कोट्यावधी रूपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांविरुद्ध महाराष्ट्र सरकारने कारवाई केलीय. सरकारने हाती घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. मे. लॅव्हिश एन्टरप्राइजेस आणि मे. आर्यन इंटरनॅशनल असं या कंपन्यांचं नाव आहे. हे प्रकरण पुढील तपासासाठी राज्य कर सहआयुक्त अन्वेषण-अ यांच्या कार्यालयात पाठवण्यात आलं होतं. तपासात ते दोषी आढळले आहेत (Thackeray Government action against tax cheating of crores in Maharashtra).

या प्रकरणात 22 डिसेंबर 2020 रोजी तपासासाठी भेट देण्यात आली होती. तपासणीदरम्यान असे लक्षात आले की, मे. लॅव्हिश एन्टरप्राइजेसचे मालक प्रकाश कुमार वीरवाल आणि मे. आर्यन इंटरनॅशनलचे मालक प्रभुलाल तेली व्यवसायाच्या ठिकाणी उपलब्ध नाहीत. सरकार दप्तरी नोंद करण्यात आलेल्या जागेवर ते कोणताही व्यवसाय करत नाहीत. एक वर्षापासून हे कार्यालय बंद असल्याचं आढळून आलं.

दोन्ही प्रकरणांमध्ये महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम,2017 च्या तरतूदीचे उल्लंघन झालेय. वस्तूंच्या पुरवठ्यांशिवाय 428 कोटी रूपयांचे बनावट बिलं देऊन आणि 79 कोटी रूपयांची बनावट वजावट मिळवून देण्यात आली. म्हणूनच दोन्ही करदात्यांना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम-2017 च्या तरतूदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. त्यांनी वस्तूंचा पुरवठा न करता बिल जारी करून शासनाचा कर बुडवला. सूरजसिंग (उर्फ विराट सिंग) यांना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने 18 फेब्रुवारी 2021 रोजी अटक केलीय. न्यायालयाने सूरजसिंग (उर्फ विराट सिंग) यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

सूरजसिंग यांनी अशाच अनेक बनावट कंपन्या नोंदणी केल्याचा संशय आहे. शासनाच्या करोडो रूपयांची महसूल हानी केल्याचा संशय महाराष्ट्र वस्तू व कर विभागाने व्यक्त केला आहे. याबाबत सहायक आयुक्त नंदकुमार दिघे यांच्या नेतृत्वाखालील आणि उपआयुक्त गजानन खानंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. या तपासासाठी अन्वेषण-अ चे सहआयुक्त ई. रविंन्द्रन यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

हेही वाचा :

सफरचंद ते मद्यपान, सेस लागू, काय स्वस्त, काय महाग?

गुंतवणूकदारांना मोठा दिलासा, भांडवलावरील नफ्यासाठी 1 वर्षांसाठी करात सूट

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोदी सरकारला सर्वात मोठी खुशखबर

व्हिडीओ पाहा : Thackeray Government action against tax cheating of crores in Maharashtra

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.