Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

म्युकोरमायकोसिसचा धोका वाढला, ठाकरे सरकार सावध; हाफकिनला दिली 1 लाख इंजेक्शन्सची ऑर्डर

हा आजार दुर्मिळ असल्याने राज्यात आतापासूनच त्यावरील औषधांचा तुटवडा जाणवत आहे. | mucormycosis

म्युकोरमायकोसिसचा धोका वाढला, ठाकरे सरकार सावध; हाफकिनला दिली 1 लाख इंजेक्शन्सची ऑर्डर
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
Follow us
| Updated on: May 11, 2021 | 3:24 PM

मुंबई: कोरोनाइतक्याच प्राणघातक असलेल्या म्युकोरमायकोसिस (mucormycosis) आजाराचा राज्यभरात वेगाने फैलाव होत असल्यामुळे आता ठाकरे सरकार कमालीचे सावध झाले आहे. हा आजार दुर्मिळ असल्याने राज्यात आतापासूनच त्यावरील औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने मुंबईच्या हाफकिन इन्स्टिट्यूटला म्युकोरमायकोसिसच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या 1 लाख इंजेक्शन्सची ऑर्डर दिली आहे. (Mucormycosis infection increases in Maharashtra)

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना याबद्दलची माहिती दिली. म्युकोरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार असून त्याबाबत तातडीने उपाययोजना होणे गरजेचे आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत या आजारावर मोफत उपचार करता येतील का, याबाबत विचारविनिमय सुरु असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

रेमडेसिविर आणि म्युकोरमायकोसिसच्या इंजेक्शन्सची मोठी ऑर्डर

राज्य सरकारने रेमडेसिविर इंजेक्शनसाठी सहा कंपन्यांना 3 लाख इंजेक्शन्सची ऑर्डर दिली आहे. हा सगळा खर्च राज्य सरकार करणार आहे. याशिवाय, म्युकोरमायकोसिसचे रुग्ण वाढत असल्याने त्यासाठी हाफकिन संस्थेला एक लाख इंजेक्शन्सची ऑर्डर देण्यात आल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

18 ते 44 वयोगटासाठीच्या लसीकरण मोहीमेला ब्रेक?

राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा 6 लाखाच्या खाली आला आहे. रिकव्हरी रेट 87 टक्के इतका झाला आहे. आपण चाचण्यांची संख्या कुठेही कमी केलेली नाही. सध्या दिवसाला 2 लाख कोरोना चाचण्या होत आहेत.

राज्यात आतापर्यंत 1 कोटी 84 लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. 45 वर्षांवरील लोकांसाठी कोव्हॅक्सिनचे 35 हजार डोस उपलब्ध आहेत. तर या वयोगटातील पाच लाख नागरिकांना कोरोना लसीचा दुसरा डोस द्यायचा आहे. त्यामुळे आता 18 ते 44 वयोगटासाठी खरेदी केलेल्या लसी 45 पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांसाठी वापरण्यात येतील. त्यामुळे 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणाची गती थोडी कमी करावी लागेल, अशी शक्यता राजेश टोपे यांनी वर्तविली.

संबंधित बातम्या:

कोरोनापेक्षा जास्त प्राणघातक असलेल्या म्युकोरमायकोसिसचा राज्यात पहिला बळी; डोंबिवलीत वृद्धाचा मृत्यू

सावधान, धोका वाढतोय; ठाण्यात आढळला म्युकोरमायकोसिसचा पहिला रुग्ण

उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात म्युकोरमायकोसिसचा झपाट्याने संसर्ग, नव्या संकटाची चाहुल?

(Mucormycosis infection increases in Maharashtra)

रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार.
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप.
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला.
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं.
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड.
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश.
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू.
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.