मुंबई: राज्य सरकारच्या गलथानपणामुळे महाराष्ट्रात 5 लाख लसी वाया गेल्या. महाविकास आघाडी सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे लसीकरणासाठी जनतेला नाहक त्रास भोगावा लागत आहे, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केली. महाराष्ट्रात अद्याप 23 लाख लसींचा साठा शिल्लक आहे. पुढची खेप येईपर्यंत या साठ्याचा योग्यपणे वापर करावा, असे रामदास आठवले यांनी सांगितले. (Union minister Ramdas Athawale take a dig at Mahavikas Aghadi govt)
रामदास आठवले यांनी शुक्रवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला. महाराष्ट्रात कोरोना लसीचा तुटवडा पडू देणार नाही. केंद्र सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, असे आश्वासन यावेळी डॉ. हर्ष वर्धन यांनी दिल्याचे आठवले यांनी सांगितले.
महाविकासआघाडी केंद्र सरकारवर लसीच्या तुटवड्यासंदर्भात करत असलेले आरोप चुकीचे आहेत. कोरोना लसीकरणावरुन राज्य सरकारने राजकारण करू नये. त्याऐवजी योग्य नियोजन करून लसीकरण सुलभ करावे असे आवाहन रामदास आठवले यांनी केले. महाराष्ट्राला केंद्र सरकार ने यापूर्वीच 1कोटी 6 लाख कोरोना लसीचा पुरवठा केला आहे.त्यातील 5 लाख लसी महाराष्ट्र सरकारने वाया घालविल्या त्यास जबाबदार कोण? असा सवाल रामदास आठवले यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्राला लागेल तेवढ्या कोरोना लसींचा पुरवठा केंद्र सरकार करेल. केंद्रीय राज्यमंत्री म्हणून मी स्वतः लक्ष देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीशी असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.
पुढच्या दहा दिवसांत महाराष्ट्रात 10 लाख अॅक्टिव्ह रुग्ण असण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भयावह परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे विरोधकांनी यावर राजकारण न करता आम्हाला उपाय सुचवावेत. सध्याच्या घडीला देशाच्या अनेक भागांमध्ये लॉकडाऊन आहे.
गुजरातमध्येही अनेक जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन आहे. मात्र, भाजपचे नेते त्यावर काही बोलत नाहीत. फक्त महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला तर भाजपचे नेते टीका करायला सुरुवात करतात, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.
सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील लोकांचे जीव वाचवण्याची गरज आहे. त्यामुळे विरोधकांनी यावरुन राजकारण करु नये. गेल्या महिन्यात एमपीएससीची परीक्षा रद्द झाली तेव्हा भाजपचे नेते रस्त्यावर उतरले. आतादेखील भाजपकडून व्यापाऱ्यांना आंदोलन करण्यासाठी चिथावले जात असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.
संबंधित बातम्या: