Maharashtra Lockdown: राज्यात 4 टप्प्यात अनलॉकिंग; काय आहे ठाकरे सरकारचा प्लॅन?

राज्यातील लॉकडाऊन एका झटक्यात न उठवता चार टप्प्यात त्याची अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे. | Maharashtra Lockdown

Maharashtra Lockdown: राज्यात 4 टप्प्यात अनलॉकिंग; काय आहे ठाकरे सरकारचा प्लॅन?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: May 24, 2021 | 12:35 PM

मुंबई: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने आता सरकार लॉकडाऊन (Lockdown) कधी उठवणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र, यापूर्वीचा अनुभव पाहता ठाकरे सरकार लॉकडाऊन उठवताना कोणतीही घाई होणार नाही, याची विशेष काळजी घेणार आहे. त्यासाठी राज्यातील लॉकडाऊन एका झटक्यात न उठवता चार टप्प्यात त्याची अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे. (Maharashtra lockdown due to Coronavirus will soon lift restrictions)

सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे सरकार 1 जूनपासून लॉकडाऊन उठवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करेल. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात दुकाने उघडली जातील. गेल्या काही दिवसांत दुकाने बंद असल्यामुळे राज्यातील व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परिणामी पहिल्या टप्प्यात हे सर्व व्यवहार सुरु करण्यावर सरकार भर देईल. तर तिसऱ्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंटस, बार आणि मद्यविक्रीची दुकाने सुरु करण्यात येतील. त्यानंतर चौथ्या टप्प्यात सरकारकडून लोकल सेवा आणि धार्मिक स्थळे सुरु केली जातील. याच काळात जिल्हाबंदी कधी उठवायची याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल.

देशात एकूण कोरोनाबळींचा आकडा तीन लाखांपार

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे (Corona Cases in India) सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात घट झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत तब्बल 18 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 2 लाख 22 हजार 315 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात भारतात 2 लाख 22 हजार 315 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 454 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 3 लाख 2 हजार 544 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. संबंधित बातम्या:

Corona Cases in India | देशात एकूण कोरोनाबळींचा आकडा तीन लाखांपार, एका दिवसात 4400 हून अधिक मृत्यू

आम्ही सर्व नियम पाळतो, पण 1 जूनपासून दुकाने उघडू द्या; व्यापाऱ्यांची ठाकरे सरकारला कळकळीची विनंती

…तर आमच्याकडे तिसरी लाट येणारच नाही; ‘या’ राज्यातील कोरोना नियंत्रणात, अनलॉकिंगची तयारी

(Maharashtra lockdown due to Coronavirus will soon lift restrictions)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.