“आमचा लेट पण थेट कार्यक्रम असतो”; सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटाचा मोठेपणा सांगितला…
आम्ही पक्षासाठी काम करणारी माणसं आहोत, पक्षप्रमुखांचा आदेश आला की, आम्ही त्यांचा आदेश फॉलो करणारी माणसं अहोत असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
मुंबईः मुंबईमध्ये नरेंद्र मोदी यांनी येऊन विविध विकासकामांचं उद्घाटन करणे, त्यानंतर महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी विविध मुद्यावर बोलणे, महाविकास आघाडीवर टीका करणे म्हणजेच हे सगळे प्रयोग भाजप मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन बोलण्यासारखे आहे अशी टीका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली. सध्या देशात आणि राज्यात टिपेला जाणारा कट्टरतावाद वाढला आहे.
त्यामुळे संविधानिक चौकट मांडणारी लोकं एकत्र येत येत संविधान वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांना पत्रकारांनी तुम्हाला ठाकरे गटाकडून लोकसभा, विधान परिषदेसाठी विचारणा वगैरे झाली का, त्यावर बोलतान त्या म्हणाल्या की, “अहो, आमचं लई ओपन किचन असतंय,आमचा लेट पण थेट कार्यक्रम असतो” निवडणुकीविषयी अशी विचारणा वगैरे काही झाली नाही.
आम्ही पक्षासाठी काम करणारी माणसं आहोत, पक्षप्रमुखांचा आदेश आला की, आम्ही त्यांचा आदेश फॉलो करणारी माणसं अहोत असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
ठाकरे गटाच्या गौरव करताना आणि त्यांचा मोठेपणा सांगताना त्या म्हणाल्या की ही शिवसेना केडर बेस पार्टी आहे. त्यामुळे पक्षप्रमुखांचा आदेश या पक्षात महत्वाचा आाहे. त्यामुळे आम्ही पक्षप्रमुखांच्या आदेशावर चालणारे कार्यकर्ते असून त्यांच्या आदेशावर चालणारी आम्ही मंडळी आहे असंही त्यांनी स्पष्ट केले.
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याविषयी बोलताना भाजपने मुंबई महानगरपालिकेसाठी आपली कशी रणनिती वापरली आहे. कारण ऐन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील कार्यक्रमासाठी भाजपने घेऊन येणे हा कार्यक्रमाचा भाग नाही तर तो त्यांच्या रणनितीचा भाग असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.