मुंबईः एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर दोन्ही गटातीली नेते प्रचंड आक्रमक झाले आहेत. त्यातच कसबा पोटनिवडणूक लागल्याने राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे आताही ठाकरे गटाच्या नेत्यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे. आजही ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी शिंदे गटावर टीका करताना म्हणाले की, धनुष्यबाण रामाच्या हाती शोभून दिसतं, रावणाच्या नाही असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याव केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा शिंदे आणि ठाकरे गटातील वाद उफाळून येण्याची चिन्हं दिसत आहेत.
ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी शिंदे गटावर टीका करताना म्हणाले की, ज्या प्रमाणे धनुष्यबाण रामाच्या हाती शोभून दिसतं रावणाच्या हाती ते शोभून दिसत नाही. त्यामुळे शिवसेनेचे धनुष्यबाण जरी तुम्हाला मिळाले असले तरी ते तुम्हाला शोभून दिसत नाही.
आताच्या राजकारणात तुम्ही जरी धनुष्यबाण घेऊन आला असला तरी, आता आम्ही मशाल घेऊन येऊ आणि त्या आमच्या मशालीनं पळवून लावू आणि तुमची दाढीपण जाळून टाकू अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता शिवधनुष्य घेऊन येत असले तरी आम्ही पण आता मशाल घेऊन येऊ. त्या मशालीनेच सगळा बदल करू आणि त्यामध्ये दाढीही जाळून टाकू असा घणाघात त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे.
ठाकरे गटाच्या सुभाष देसाई यांच्या या टीकेमुळे आता दोन्ही गटातील वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. त्यातच तुमची दाढी जाळून टाकू अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे. त्यामुळे त्यावरूनही तो वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे असं मत व्यक्त केले जात आहे.