“मोदींनी नकली म्हणणं त्यांना किती अंगलट आलं बघितलं, शिवसेनेचं अधिष्ठान मात्रोश्री आणि ठाकरे”
देशभरातील लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यावर महाराष्ट्रात महायुतीला झटका बसला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विधानसभेचा जो काही कल समोर आला आहे त्यानुसार महाराष्ट्रात मविआचं सरकार स्थापन होत असल्याचं दिसत आहे. यावर सुषमा अंधारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
लोकसभेच्या निकालानुसार विधानसभा पोलमध्ये महायुतीला झटका बसत आहे. कारण या आकडेवारीनुसार महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात येतंय. महायुतीला 127 आणि महाविकास आघाडीला 158 जागा मिळण्याचा पोल समोर आला आहे. यावर ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यम आमच्यासाठी चांगल्या बातम्या दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, ह्यासाठी मी माध्यम प्रतिनिधिंची आभारी आहे.. पण चांगल्या बातम्या येतं असतील तरी आम्ही डोक्यात अजिबात हवा जाऊन देणारं नाही. म्ही अजून जास्त फिल्डमध्ये जास्त मेहनत घेतली पाहिजे आणि ज्या उणिवा, त्रुटी लोकसभेत राहून गेल्या आहेत, त्यांचा नीट अभ्यास करून कामं करणारं. कितीही भाजप आणि मोदींनी आम्हाला असली नकली म्हणायचं ठरवलं तरी, आम्हाला असली नकली म्हणणं त्यांच्या किती अंगलट आलेलं आहे हे आपण बघितलं असल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेचं अधिष्ठान हे मात्रोश्री आणि ठाकरे नावात आहे, शिवसेना हा भावनिक ऐक्यावर आधारलेला पक्ष. त्यामुळं शिवसेने त्या पद्धतीने मेहनत घेतलेली आहे. आम्ही विधानसभेला कमबॅक करणारं याची खात्री आहे. त्या साठी आत्तापासून हुरळून न जाता आत्ता शांतपणे काम करणं जास्त गरजेचं असल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्या.
दरम्यान, या आकडेवारीनुसार महायुतीचे विद्यमान आमदार आहेत त्या ठिकाणी महाविकास आघाडीला लीड मिळालं आहे. महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सर्वाधिक जागांचा फायदा होत असल्याचं दिसत आहे. शरद पवार गटाकडे सध्या 12 आमदार आहेत मात्र लोकसभेच्या कलानुसार शरद पवार यांच्या 40 जागा वाढत आहेत. भाजपला मोठा फटका बसलेला दिसत असून त्यांचे 102 आमदार असून त्यांच्या मतदारसंघात 42 जागांचा फटका बसलेला पाहायला मिळत आहे.