आदित्य ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा छेडला; शपथ घेऊन एकनाथ शिंदे आव्हान दिलं..

निधी वाटपाबाबत हे सरकार नेमकं काय करतं आहे तेही यावरून कळेल असा टोलाही त्यानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

आदित्य ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा छेडला; शपथ घेऊन एकनाथ शिंदे आव्हान दिलं..
Follow us
| Updated on: Mar 13, 2023 | 4:29 PM

गोरेगाव : ज्या गद्दार आमदारांनी शिवसेनेबरोबर ज्या गद्दारांनी हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन बंडखोरी केली त्यांनी हिंदुत्वाचा खरा अर्थ तरी माहिती आहे का असा सवाल आमदार आदित्य ठाकरे यांनी गोरेगावमधील सभेत केला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना त्यांनी मुंबई महानगरपालिकेपासून ते अगदी आताच्या शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, आताच्या अर्थसंकल्पामध्ये 40 गद्दार आमदारांना किती निधी मिळाला यावर नजर टाकली तर या सरकारचे धोरण तुम्हाला लक्षात येईल. मात्र सरकारच्या या धोरणामुळे लोकशाही धोक्यात येत असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

निधी वाटपाबाबत हे सरकार नेमकं काय करतं आहे तेही यावरून कळेल असा टोलाही त्यानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

या सरकारमधील जे 40 गद्दार आमदार सांगत आहेत की, हिंदुत्वासाठी म्हणून आम्ही महाविकास आघआडीतून बाहेर पडलो. शिवसेनेने हिंदुत्व सोडलेले होते म्हणून आम्ही एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बाहेर पडलो असल्याचे सांगितले ते हिंदु्त्व खोटं असल्याचा हल्लाबोलही त्यांनी त्यांच्यावर केलाआहे.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी ज्यावेळी उद्धव ठाकरे आयोध्येला गेले होते. त्यावेळी तुम्ही सोबत होता मग तुम्ही बंद डोळ्यांनी त्यांच्यासोबत गेला होता का असा सवालही त्यांनी यावेळी केला.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असतानाही आणि त्या पदावर नसतानाही ते आयोध्येला गेले होते. त्यावेळी तुम्हाला त्यांचे हिंदुत्व का दिसले नाही असा सवाल त्यांनी बंडखोर आमदारांनाही केला आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असतानाही राष्ट्रवादीला स्पष्टपणे सांगितले होते, की आमचं हिंदुत्व हे आमचं हिंदुत्व आहे.

आमचं हिंदुत्व हे खा आणि ते खाऊ नका असंही कुणी सांगत नाही. आमचं हिंदुत्व कुणाला जाळण्याचं हिंदुत्व नाही आहे आमचं हिंदुत्व हे धर्माधर्मातील वाद निर्माण करण्यातील नाही.

आमतं हिंदुत्व हे सर्वाना सोबत घेऊन जाणारं असल्याचे सांगित हिंदुत्वावरून त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सगळ्यांचं रक्त हे लालच असते आणि ते सोबत घेऊन जाणारंच आहे त्यामुळे आमचं हिंदुत्व हे भेदभाव निर्माण करणारं हिंदुत्व नाही तर सर्वांना सोबत घेऊन जाणार असल्याचेही त्यांनी शिंदे-फडणवीस यांना ठणकाऊन सांगितले.

आमचं हिंदुत्व हे महाराष्ट्राला आणि देशाला पुढं घेऊन जाणारं हिंदुत्व आहे. त्यामुळे हे गद्दार आमदार जे हिंदत्व सांगत आहेत, त्या हिंदुत्वामुळे ही लोकशाही धोक्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.