“जिथे जिथे निवडणुका येतात त्याच ठिकाणी मोदीसाहेब जातात”; ठाकरे गटाच्या नेत्याने भाजपची रणनितीच स्पष्ट करुन सांगितली…

पूर्वी शिवसेनेने जी कामं आखली होती त्यांचे उद्घाटन करण्याचे काम नरेंद्र मोदी करीत आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे.

जिथे जिथे निवडणुका येतात त्याच ठिकाणी मोदीसाहेब जातात; ठाकरे गटाच्या नेत्याने भाजपची रणनितीच स्पष्ट करुन सांगितली...
Follow us
| Updated on: Jan 19, 2023 | 4:14 PM

मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत, त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. पंतप्रधान मुंबई दौऱ्यावर येत असल्याने आणि येत्या काही दिवसात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार असल्यानेच त्या डोळ्यासमोर ठेऊन नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा असल्याची टीका ठाकरे गटाकडून केली जात आहे. ठाकरे गटाचे नेते आमदार भास्करराव जाधव यांनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

भाजपवर टीका करताना ते म्हणाले की, मुंबईमध्ये मोदीसाहेब येत आहेत म्हणजे आपण समजलं पाहिजे की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ येऊ घातली आहे असा टोला त्यांनी भारतीय जनता पार्टीला लगावला आहे.

नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वेगवेगळ्या कामांचे उद्घाटन होणार असल्याने भाजपच्या नेत्यांकडूनही वेगवेगळी अश्वासनं दिली जात आहे, आणि विकासकामांविषयी बोलले जात आहे.

त्यामुळे भास्करराव जाधव यांनी भारतीय जनता पार्टी ही वाचाळवीरांची पार्टी असल्याची खोचक टीका करण्यात आली आहे.

ज्या ज्या ठिकाणी निवडणुका होत असतात, त्या त्या ठिकाणी भाजपकडून नरेंद्रम मोदी येत असतात. कोरोनाच्या काळात मुंबई मोठ्या संकटात होती मात्र त्यावेळी नरेंद्र मोदी मुंबईत आले नाहीत असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.

भास्करराव जाधव यांनी कोरोना काळातील संकटाची आठवण करून देत नरेंद्र मोदी यांनी ऐन कोरोनाच्या काळातच मुंबईची विशेष काळजी घेतलेली नव्हती तर आता मात्र निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आले असल्याची टीका भास्कररावर जाधव यांच्याकडून करण्यात आली आहे.

विकास कामांवरून आता श्रेयवादाचे राजकारण तापले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं करण्यात आली होती.

त्याच कामांवरून आता श्रेयवादाचे राजकारण तापले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात जी विकास कामं करण्यात आली होती, त्याच विकास कामांचे उद्घाटन नरेंद्र मोदी करणार असल्याची टीका भास्करराव जाधव यांनी केली आहे.

यावर बोलताना ते म्हणाले की, पूर्वी शिवसेनेने जी कामं आखली होती त्यांचे उद्घाटन करण्याचे काम नरेंद्र मोदी करीत आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे.

विकास कामांवरून ज्या प्रमाणे टीका करण्यात आली आहे त्याच प्रमाणे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वक्तव्य करायचं हे नरेंद्र मोदी यांची खासियत आहे अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

नरेंद्र मोदी मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच ते मुंबईत येत आहेत मात्र मुंबईची जनता ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे असा विश्वासही भास्करराव जाधव यांनी व्यक्त केला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.