“आगामी काळातील प्रत्येक निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढू”; राऊतांच्या वक्तव्यानंतरही या नेत्याला विश्वास..
वैयक्तिक पातळीवर टीका केली जात असून ही टीका केली जात असताना प्रत्येकाने आपला तोल सांभाळणे गरजेचे आहे असा सल्लाही त्यांनी बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना दिला आहे.
मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे ढवळून निघाले आहे. खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यावरूनच आता महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होत असल्याचे बोलले जात आहे. खासदार संजय राऊत यांच्या टीकेनंतर आता ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत यांनी विश्वास देत महाविकास आघाडीमध्ये कोणतीही बिघाडी नसून प्रत्येकाची बोलण्याची स्टाईल असते त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कोणताही मतभेद नाही त्यामुळे आगामी काळातही महाविकास आघाडी एकत्रच राहणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
खासदार विनायक राऊत यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून राजकारणात खालची पातळी गाठली गेली आहे. त्यामुळे टीका केली जात असताना नळावरील भांडणासारख्या शिव्या दिल्या जात आहे.
वैयक्तिक पातळीवर टीका केली जात असून ही टीका केली जात असताना प्रत्येकाने आपला तोल सांभाळणे गरजेचे आहे असा सल्लाही त्यांनी बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना दिला आहे.
खासदार संजय राऊत यांच्याकडून टीका केली जात असली तरी राजकारणात प्रत्येकाने आपला तोल सांभाळावा असं सांगत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
संजय राऊत यांच्याकडून टीका केली जात असताना समोरची व्यक्ती ज्या पद्धतीने बोलत असते त्याच पद्धतीने संजय राऊत यांना बोलावे लागते असं सांगत त्यांन त्यांची बाजू घेतली आहे.
ज्या प्रकारे संजय राऊत भाजपवर टीका करत असतात. मात्र भाजपने जे आपले प्रवक्ते नेमलेले आहेत ते प्रवक्ते संजय राऊत यांच्या तोडीचे नाह असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.