मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे. या योजनेवर विरोधक टीका करत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेवर बोलताना शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील हे सरकार १५००च्यावर जाणार नाही. स्वत १५ हजार कोटी ठेवतील. पण बहिणींना १५००, कर्मचाऱ्यांना १५०० देतील. त्यांचं १५०० चं लिमिट आहे. त्यांचा एक पेग १५०० चा आहे. त्याच्यावर ते जाणार नाही. आमच्याकडून कुणी कोर्टात गेलं नाही. कोर्ट त्यांच्या बाजूने आहे. ते कोर्टालाही १५०० पाठवतील, असं संजय राऊत म्हणाले.
गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत. ते मुख्यमंत्री आहेत. गडचिरोलीचा कायापालट करणार असं सांगत होते. आदिवासी आणि गडचिरोली जिल्ह्याचा कायापालट करण्यापैक्षा या ठिकाणी खाण उद्योग आहे. त्याचा आर्थिक व्यवहार आपल्याला हातात राहावा म्हणून मुख्यमंत्र्यांनी जिल्हा जवळ ठेवला आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी नेमले आहेत. आदिवासींचा विकास नाहीये. आदिवासींना मृतदेह खांद्यावर घेऊन जावं लागत आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यनमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
हे सरकार महाराजांच्या नावाने भ्रष्टाचार करत आहे. महाराजांचा महाराष्ट्र लुटला जात आहे. गुजरातचे ठेकेदार महाराष्ट्र लुटत आहेत. काल आम्ही दुष्काळी भागात होतो. परभणी, हिंगोली, संभाजीनगर येथील रस्ते वाहून गेले. तिकडचे जे तरुण कार्यकर्ते आहेत, ज्यांची घरे शाळा गुरंढोरं वाहून गेली. त्यांनी कागदपत्रे आमच्यासमोर ठेवली. या ग्रामीण भागातील रस्त्याची कामे गुजरातच्या ठेकेदारांना दिली आहेत. महाराष्ट्रात तरुण नाहीत का. आम्ही काल फिरत होतो. दुष्काळाची अवस्था गंभीर आहे. सर्व वाहून गेलं आहे. सरकारने पंचनामा केला नाही. गुजरातच्या ठेकेदारांनी केलेले रस्ते वाहून गेले आहेत, असंही संजय राऊत म्हणालेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या काळात आमच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले. मग फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करणार का? मी नवाब मलिक आणि अनिल देशमुखांवर खोटे गुन्हे दाखल केले. मग गृहखात्याला दोषी धरणार का?, असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केलाय.