दक्षिण मुंबई जिंकली, तरीही धाकधूक; ‘या’ विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाला अपेक्षित आघाडी नाहीच

लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजणार आहे. या निवडणुकीत ठाकरे गटाला दक्षिण मुंबईत यश मिळालं. पण तरीही या मतदारसंघातील विधानसभानिहाय आकडेवारी ही ठाकरे गटाला धडकी भरवणारी आहे.

दक्षिण मुंबई जिंकली, तरीही धाकधूक; 'या' विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाला अपेक्षित आघाडी नाहीच
उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jun 14, 2024 | 6:45 PM

दक्षिण मुंबईचे ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत दक्षिण मुंबईमधून निवडून आले. मात्र ठाकरेंचे आमदार असेलेल्या मतदारसंघात अपेक्षित आघाडी मिळाली नसल्याचं चित्र आहे. वरळीचे आमदार असलेले आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातून अरविंद सावंत यांना अपेक्षित अशी लीड मिळाली नाही. ठाकरे गटाचे वरळीमध्ये विधानपरिषदेचे दोन आमदार आहेत तरी देखील अरविंद सावंत यांना अपेक्षित लीड मिळाली नाही. तर दुसरीकडे शिवडी विधानसभेत लालबाग, परेल ठाकरे गटाचा बालेकिल्ला असताना देखील केवळ 17 हजार 48 मतांची लीड मिळाली.

अरविंद सावंत यांना सर्वाधिक लीड ही शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्याव भायखळा मतदारसंघ आणि काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांच्या मतदारसंघातून मिळाली आहे. अरविंद सावंत यांना भायखळा विधानसभेतून 46 हजारांची लीड तर अमीन पटेल यांच्या मुंबादेवी मतदारसंघातून 37 हजार 799 मतांची लीड मिळाली आहे. बालेकिल्यात ठाकरे गटाला अपेक्षित मतदान मिळत नसल्याने ठाकरे गटाला चिंतन करण्याची गरज आहे.

दक्षिण मुंबई लोकसभा निहाय आकडेवारी

उमेदवार अरविंद सावंत (ठाकरे गट) विरुद्ध यामिनी जाधव (शिंदे गट)

वरळी विधानसभा – आमदार आदित्य ठाकरे (ठाकरे गट)

अरविंद सावंत -64 हजार 844 यामिनी जाधव – 58 हजार 129 अरविंद सावंत आघाडी – 6 हजार 715

शिवडी विधानसभा – आमदार अजय चौधरी (ठाकरे गट)

अरविंद सावंत – 77 हजार 344 यामिनी जाधव – 60 हजार 296 अरविंद सावंत आघाडी – 17 हजार 48

भायखळा विधानसभा – आमदार यामीनी जाधव (शिंदे गट)

अरविंद सावंत – 86 हजार 883 यामिनी जाधव – 40 हजार 817 अरविंद सावंत आघाडी – 46 हजार 66 मतांनी आघाडीवर

मलबार हिल विधानसभा – आमदार मंगलप्रभात लोढा (भाजप)

अरविंद सावंत – 39 हजार 573 यामिनी जाधव – 87 हजार 860 यामिनी जाधव आघाडी – 48 हजार 287 मतांनी आघाडीवर

मुंबादेवी विधानसभा – आमदार अमीन पटेल (काँग्रेस)

अरविंद सावंत – 74 हजार 469 यामिनी जाधव – 36 हजार 690 अरविंद सावंत आघाडी – 37 हजार 799

कुलाबा विधानसभा – आमदार राहुल नार्वेकर (भाजप)

अरविंद सावंत – 47 हजार 684 यामिनी जाधव – 56 हजार 778 यामिनी जाधव आघाडी – 9 हजार 94 मतांनी आघाडीवर

अरविंद सावंत पोस्टल मतदान मिळून 53 हजार 384 मतांनी विजयी

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.