ठाण्यात अधिगृहित खासगी रुग्णालयातील दांडी मारणाऱ्या डॉक्टर्स-कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, आयुक्तांचे आदेश
हॅास्पिटलमधील सेवेत हजर न झालेल्या कर्मचाऱ्यांविरोधात भारतीय दंड संहित कलम 188 मधील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करा असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
ठाणे : ठाणे शहरात कोव्हिड-19 चा सामना (Thane COVID-19 Hospital) करण्यासाठी आणि कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेने काही खासगी रुग्णालयं अधिगृहित केली आहेत. या रुग्णालयांतील डॅाक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचारी त्या-त्या रुग्णालयांमध्ये कामावर उपस्थित न राहिल्याने त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत. महापालिकेच्या तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर याची जबाबदारी सोपवण्यात (Thane COVID-19 Hospital) आली आहे.
ठाणे शहरात कोव्हिड-19 चा सामना करता यावा आणि रुग्णांवर तातडीने उपचार करता यावेत यासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने अनेक खासगी रुग्णालये त्यामध्ये काम करणाऱ्या डॅाक्टर्स आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांसह अधिगृहित करण्यात आली आहेत. महापालिका प्रशासनाने यापूर्वी तसे आदेशही दिले आहेत. तरीही कौशल्या हॅास्पिटल, होरायझन प्राईम आणि ठाणे हेल्थ केअर सेंटर या रुग्णालयातील डॅाक्टर्स आणि इतर कर्मचारी हे सेवेत हजर झालेले नाही. ही बाब लक्षात घेवून या तीनही हॅास्पिटलमधील सेवेत हजर न झालेल्या कर्मचाऱ्यांविरोधात भारतीय दंड संहित कलम 188 मधील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत (Thane COVID-19 Hospital).
मुंबई, पुण्यानंतर ठाण्यात कोरोनाचा कहर, कुठे किती कोरोनाबाधित?https://t.co/QnGeiq6qXY #CoronaPandemic #Coronaindia
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 27, 2020
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 56 हजार 948 वर
राज्यात आज दिवसभरात तब्बल 2 हजार 190 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या आता 56 हजार 948 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात 964 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत 17 हजार 918 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सध्या 37 हजार 125 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आज सर्वाधिक 105 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबळींची संख्या 1897 इतकी झाली आहे.
Thane COVID-19 Hospital
संबंधित बातम्या :
Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात 105 जणांचा कोरोनाने मृत्यू, बाधितांचा आकडा 56,948 वर
Pune Corona | पुण्यात कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण वाढलं, आतापर्यंत 2,875 जणांची कोरोनावर मात
मुंबई-पुणे रिटर्नने बुलडाण्यात कोरोनाबाधितांची वाढ, आतापर्यंत 48 जणांना लागण
मुंबई, पुण्यानंतर ठाण्यात कोरोनाचा कहर, कुठे किती कोरोनाबाधित?