ठाण्याच्या माजी नगरसेवकाच्या गर्भवती मुलीचा मृतदेह न्यूझीलंडच्या बीचवर!

मुंबई: ठाण्यातील माजी नगरसेवकाच्या गर्भवती मुलीचा मृतदेह न्यूझीलंडमधील समुद्रकिनारी सापडल्याने खळबळ उडाली आहे. माजी नगरसेवक विजय साळगावकर यांची 26 वर्षीय मुलगी सोनम शेलार (26) हिचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळला. न्यूझीलंडच्या वैरारप्पा बीचवर हा मृतदेह आढळल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. याप्रकरणी सोनमचा पती सागर शेलार याची न्यूझीलंड पोलीस चौकशी करत आहेत. दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच, कोपरी […]

ठाण्याच्या माजी नगरसेवकाच्या गर्भवती मुलीचा मृतदेह न्यूझीलंडच्या बीचवर!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM

मुंबई: ठाण्यातील माजी नगरसेवकाच्या गर्भवती मुलीचा मृतदेह न्यूझीलंडमधील समुद्रकिनारी सापडल्याने खळबळ उडाली आहे. माजी नगरसेवक विजय साळगावकर यांची 26 वर्षीय मुलगी सोनम शेलार (26) हिचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळला. न्यूझीलंडच्या वैरारप्पा बीचवर हा मृतदेह आढळल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. याप्रकरणी सोनमचा पती सागर शेलार याची न्यूझीलंड पोलीस चौकशी करत आहेत. दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच, कोपरी परिसरात राहणारे सोनमचे आई वडील न्यूझीलंडकडे रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे सोनम गर्भवती होती. तिचे पाच ते सहा महिन्यांपूर्वीच अंबरनाथ येथील सागर शेलार (27) याच्याशी अरेंज मॅरेज झाले होते. लग्नानंतर सोनम आणि सागर न्यूझीलंड इथे राहायला गेले होते.

समुद्रकिनारी मृतदेह

सोनमचा मृतदेह न्यूझीलंडपासून 140 किलोमीटर अंतरावर असलेल्या वेलिंग्टनमधील वैरारप्पा बीचवर आढळून आला. सोनम बेपत्ता होती, मात्र तिचा मृतदेहच सापडल्याने खळबळ उडाली आहे. पाच महिन्यांची गर्भवती असलेली सोनम, 15 नोव्हेंबरला पती सागरसोबत तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेली होती. न्यूझीलंड पोलिसांनीच याबाबतची माहिती दिली. मात्र ही हत्या की आत्महत्या हे तातडीने सांगणं कठीण आहे, असंही पोलिसांनी नमूद केलं.

पोलिसांनी सोनमचे दोन फोन ताब्यात घेतले आहेत. पोलिसांनी सागरकडून या मोबाईलचे पासवर्ड मागून घेतले. एक फोन iphone 10 हा वॉटरप्रूफ होता, तर एक फोन चालत नाही, असं सागरने सांगितलं. फोन कॉल्स, मेसेजच्या आधारे पोलीस चौकशी करत आहेत. हे प्रकरण आंतरराष्ट्रीय असल्याने पोलीस अत्यंत सावध पावलं टाकत आहेत. त्यामुळे ही हत्या की आत्महत्या याबाबत जाहीर अंदाजही वर्तवणं पोलिसांनी टाळलं. वैद्यकीय अहवालानंतरच आम्ही याबाबतच सांगू शकू, असं पोलिसांनी म्हटलं.

दरम्यान, सोनमची गर्भलिंग निदान चाचणी झाली होती, पण ते सार्वजनिक करणार नाही, असंही पोलिसांनी सांगितलं. पोलीस वैराराप्पा समुद्रकिनारीही काही धागेदोरे मिळतात का याचा तपास करत आहेत.

सोनम आणि सागर हे वेलिंग्टनमधील खंडाल्लाह या उपनगरात राहात होते. सागरने सोनमला शेवटचं शनिवारी पाहिलं होतं, तर शेजाऱ्यांना ती शुक्रवारी दिसली होती. त्यानंतर सोनम बेपत्ता होती. सागर सध्या तपासात पूर्ण सहकार्य करतोय, त्यामुळे त्याला देश सोडण्याचीही परवानगी देण्यात आल्याचं न्यूझीलंडच्या तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं.

व्हाईट रॉक बीच एक निर्जन स्थळ

वैरारप्पा बीच हा व्हाईट रॉक बीच म्हणूनही ओळखला जातो. हा समुद्र किनारा अत्यंत निर्जन स्थळ आहे. जेव्हा वातावरण थंड असतं, वारे वाहत असतं तेव्हा या समुद्रकिनारी कोणीही जात नाही. त्यामुळे सोनमचा मृतदेह या किनारी कसा पोहोचला असा प्रश्न आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.