ठाण्यात एकनाथ शिंदेंकडून 109 वर्षांच्या आजीबाईंचा सत्कार
ठाण्यात राहणाऱ्या 109 वर्षांच्या आजी विठाबाई पाटील यांचा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. Eknath Shinde confers Oldest Lady in Thane
ठाणे : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी 109 वर्षांच्या आजीबाईंचा जाहीर सत्कार केला. ‘इडापिडा टळो आणि कोरोना व्हायरस होळीत जळून जावो’ अशा अनोख्या शुभेच्छा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणेकरांना दिल्या. (Eknath Shinde confers Oldest Lady in Thane)
‘कोरोना व्हायरसमुळे होळीच्या सणावर भीतीचे सावट असले, तरी महाराष्ट्र ही संतांची भूमी असल्याने कोरोना व्हायरस होळीत जळून जाईल’ असं एकनाथ शिंदे म्हणाले. कोरोनाची बाधा कोणालाही होऊ नये, यासाठी आरोग्य यंत्रणेने काळजी घेतली आहे. कोरोना व्हायरसने बाधित झालेल्या रुग्णांसाठी सर्व मोठ्या सरकारी इस्पितळात बेड आरक्षित ठेवल्याची माहितीही त्यांनी दिली.
तोंडाच्या मास्कचा काळाबाजार करणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करणार असल्याचे सूतोवाच करत, नागरिकांनी त्रास होताच डॉक्टरकडे धाव घ्यावी, अशी सूचनाही एकनाथ शिंदेंनी केली.
ठाण्यात राहणाऱ्या 109 वर्षांच्या आजी विठाबाई पाटील यांचा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी पाटील कुटुंबही सत्काराला उपस्थित होतं. (Eknath Shinde confers Oldest Lady in Thane)
नवी मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी विजयी होईल, असा विश्नासही शिंदेंनी व्यक्त केला. वेळेच्या आधीच मेट्रो प्रकल्प पूर्ण होईल. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं पाहिजे आणि धनगर समाजालाही आरक्षण मिळालं पाहिजे, त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे, अशी भूमिका आपल्या राज्य सरकारची असल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक साठीत बोहल्यावर