कोरोनाच्या काळात जीवावर उदार होऊन मृतदेहांना अग्नी दिला, पण आता कोसळली बेकारीची कुऱ्हाड

ठाण्यातील जवाहरबाग स्मशानभूमीत गेले सहा महिने एकूण साठ कंत्राटी कामगार नेमण्यात आले होते. | Thane mahanagar palika

कोरोनाच्या काळात जीवावर उदार होऊन मृतदेहांना अग्नी दिला, पण आता कोसळली बेकारीची कुऱ्हाड
Follow us
| Updated on: Nov 23, 2020 | 5:29 PM

ठाणे: कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला असताना ठाण्यात स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर आता बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. पूर्वीच्या तुलनेत ठाण्यातील कोरोना मृतांची संख्या कमी झाल्याने कंत्राटी कामगारांवर ही वेळ ओढावली आहे. त्यामुळे आता या कामगारांनी प्रशासनाविरोधात संघर्षाची भूमिका घेतली आहे. त्यांच्या या संघर्षाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) साथ मिळत आहे. (Corona warriors lost jobs in Thane)

ठाण्यातील जवाहरबाग स्मशानभूमीत गेले सहा महिने एकूण साठ कंत्राटी कामगार नेमण्यात आले होते. कोरोनाची प्रचंड दहशत असतानाच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून तीन पाळ्यांमध्ये काम करत या सर्वांनी आपले कर्तव्य चोख बजावले. परंतु आता कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच त्यांना तडकाफडकी कामावरून काढण्याने घरी बसण्याची वेळ आली.

त्यामुळे आता या कामगारांनी प्रशासानविरोधात आवाज उठवला आहे. त्यांनी सोमवारी मनसेचे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या. त्यानंतर अविनाश जाधव यांनी ठाणे महानगरपालिकेला इशारा दिला आहे. आम्ही ही बाब महानगरपालिका आयुक्तांच्या कानावर घालू. त्यानंतर सकारात्मक निर्णय होईल, अशी आशा आम्हाला असल्याचे जाधव यांनी सांगितले.

तसेच जवाहरबाग स्मशानभूमीत जाळण्यात आलेले मृतदेह आणि पालिकेच्या आकडेवारीत तफावत दिसून आली आहे. त्यामुळे पालिकेच्या आकेडवारीत काहीतरी गौडबंगाल असल्याचा आरोपही अविनाश जाधव यांनी केला. त्यामुळे आता ठाणे महानगरपालिकेकडून यावर काय स्पष्टीकरण दिले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लॉकडाऊनमध्ये रोजगार गेला, तबलावादकानं केली ‘विदर्भ अमृततुल्य’ चहाच्या ब्रँड निर्मिती पुण्या-मुंबईत मातब्बर गायक सेलिब्रिटींना तबला वादनाद्वारे साथ करणाऱ्या शुभम देवाळकर (Shubham Devalkar) यानं कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटावर मात केली आहे. शुभम देवाळकरने बल्लारपूर शहरात 6 लाख रुपये भांडवलाची गुंतवणूक करत ‘विदर्भ अमृततुल्य’ चहाचा ब्रँड बनवला आहे. कोरोना काळात मैफिली बंद झाल्याने शुभमच्या आयुष्याला वेगळी वाट मिळाली आहे.

संबंधित बातम्या:

मुंबई लोकल सुरु करण्याबाबत वेट अँड वॉच भूमिका, परिस्थिती पाहून निर्णय घेऊ : पालिका आयुक्त

Mumbai Corona | मुंबई महापालिका कोरोना संसर्गाविरुद्ध अ‌ॅक्शन मोडमध्ये, मिशन धारावी सुरु

बिनधास्त राहण्याची प्रवृत्ती वाढली, पुन्हा निर्बंध लावणार, राजेश टोपेंचा कडक इशारा

(Corona warriors lost jobs in Thane)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.