मुंबई : राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे (Thane Municipal Corporation Commissioner Transfer) सत्र सुरुच आहे. तीन महापालिका आयुक्तांच्या तडका फडकी बदलीनंतर आता ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल (IAS Vijay Singhal) यांचीही बदली करण्यात आली आहे. त्या पदावर डॉ. विपीन शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी यासंदर्भातले पत्र पाठवले आहे (Thane Municipal Corporation Commissioner Transfer).
डॉ. विपीन शर्मा हे विदेशी प्रशिक्षणासाठी गेले आहेत. तिथून आल्यानंतर त्यांनी तातडीने ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारावा असं कुंटे यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे. मार्च 2020 ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी विजय सिंघल यांची नियुक्ती करण्यात आली होती.
ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच अतिरिक्त आयुक्तांकडे पदभार देऊन सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संजीव जयस्वाल यांच्या जागी विजय सिंघल यांच्याकडे आयुक्तपद देण्यात आले होते. पाच वर्षांनी ठाणे महापालिकेला नवे आयुक्त मिळाले होते. मात्र आता त्यांची बदली करण्यात आली आहे (Thane Municipal Corporation Commissioner Transfer).
नवी मुंबई, उल्हासनगर आणि मीरा भाईंदर महापालिकांच्या आयुक्तांची बदली
राज्यात तीन आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. नवी मुंबई, उल्हासनगर आणि मीरा भाईंदर महापालिकांच्या आयुक्तपदी नवीन अधिकाऱ्यांची वर्णी लागली आहे. तुकाराम मुंढे यांच्याआधी नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी असलेल्या अभिजीत बांगर यांची चार महिन्यात दुसऱ्यांदा बदली झाली आहे. अभिजीत बांगर यांची आता नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
दुसरीकडे, राज दयानिधी यांची उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर विजय राठोड यांची मीरा भाईंदर महापालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लागली आहे.
IAS Transfer | राज्यात तीन आयएएस अधिकाऱ्यांची बदली, तीन महापालिकांचे आयुक्त बदलले https://t.co/fVZjKBnuR1 @abhijitbangar
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 23, 2020
Thane Municipal Corporation Commissioner Transfer
संबंधित बातम्या :
नवी मुंबई महापालिका आयुक्तांची तडका फडकी बदली, अभिजित बांगर नवे आयुक्त
तुकाराम मुंढेंवर 20 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, महापौरांकडून पोलिसात तक्रार दाखल