मर्सिडीजने उडवल्याने दुचाकीचालकाचा मृत्यू,कारचालक तरुण अखेर पोलिसांच्या स्वाधीन

ठाणे नौपाडा येथे काल रात्री घडलेल्या 'हीट एण्ड रन' प्रकरणातील आरोपी अखेर पोलिसांच्या स्वाधीन झाला आहे.

मर्सिडीजने उडवल्याने दुचाकीचालकाचा मृत्यू,कारचालक तरुण अखेर पोलिसांच्या स्वाधीन
Naupada hit-and-run case
Follow us
| Updated on: Oct 22, 2024 | 8:12 PM

ठाण्यातील नौपाडा परिसरात एका भरधाव आलीशान मर्सिडीज कारने धडक दिल्याने मोटारसायकलीवरुन जाणारा एका तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री उशीरा घडली होती. या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषीत करण्यात आले होते. या प्रकरणातील कार चालक घटनास्थळावर वैद्यकीय मदतीसाठी न थांबता पसार झाला होता. या प्रकरणात अखेर हा कार चालक नौपाडा पोलिसांच्या स्वाधीन झाला आहे.

ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नितीन जंक्शन येथे नाशिक हायवेने मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एका भरधाव कार चालकाने दुचाकी चालकाला जोरदार धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना काल रात्री 1.50 वाजण्याच्या सुमारास घडली होती. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या दर्शन हेगडे ( 21 रा.वागळे इस्टेट ) यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील मर्सिडीज कारचा  चालक घटना स्थळी न थांबता पळून गेला होता, त्यामुळे खळबळ उडाली होती.

आरोपी पोलिसांच्या स्वाधीन

या प्रकरणातील टीव्हीएस मोटार सायकल पेशाने टॅक्स कन्सलटन्ट असलेल्या फिर्यादी दीशीत ठक्कर यांची आहे. ही मोटरसायकल त्यांच्याकडे कामाला असलेल्या शशांक हेगडे वापरत होते. त्यांचा लहान भाऊ दर्शन चायनीझ आणण्यासाठी वागळे इस्टेट येथे गेला होता. त्यानंतर तो घरी जात असताना हा अपघात घडला. नितीन जंक्शन येथे नाशिक हायवेने मुंबईकडे येणाऱ्या मर्सिडीज कार ( MH 02 BK 1200  ) चालक अभिजित नायर याच्या कारचे नियंत्रण चुकल्याने त्याने दर्शन हेगडे यांच्या टीव्हीएस मोटरसायकलला धडक दिली. त्यात दर्शन हेगडे याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर घटनास्थळावरुन पसार झालेल्या आरोपी अभिजीत नायर याने अखेर ठाणे पोलिस आयुक्तालयात जाऊन सरेंडर केले आहे.

'शिरसाटांच्या मताला महायुतीत...', शिंदेंच्या दोन मंत्र्यामध्येच जुंपली
'शिरसाटांच्या मताला महायुतीत...', शिंदेंच्या दोन मंत्र्यामध्येच जुंपली.
'भाजप माझ्यासाठी लकी नव्हता, तिथे सगळे आमदार होतात पण...'
'भाजप माझ्यासाठी लकी नव्हता, तिथे सगळे आमदार होतात पण...'.
'वडिलांचा एकही अवयव शाबूत नाही, फक्त 3 हाडं', बापासाठी लेक ढसाढसा रडली
'वडिलांचा एकही अवयव शाबूत नाही, फक्त 3 हाडं', बापासाठी लेक ढसाढसा रडली.
मतदारसंघातील मुलीवर अत्याचार अन् घटनेवर बोलताना खासदार ढसाढसा रडला
मतदारसंघातील मुलीवर अत्याचार अन् घटनेवर बोलताना खासदार ढसाढसा रडला.
शास्त्रींकडून आरोपीच्या मानसिकतेचा विचार, देशमुख कुटुंब थेट भगवानगडावर
शास्त्रींकडून आरोपीच्या मानसिकतेचा विचार, देशमुख कुटुंब थेट भगवानगडावर.
'शिरसाटांचा संजय राजाराम राऊत होऊ नये बस...', भाजप नेत्याचा खोचक सल्ला
'शिरसाटांचा संजय राजाराम राऊत होऊ नये बस...', भाजप नेत्याचा खोचक सल्ला.
'एक चापटअन् वडिलांची हत्या, आमची मानसिकता आज काय?';देशमुख कुटुंब नाराज
'एक चापटअन् वडिलांची हत्या, आमची मानसिकता आज काय?';देशमुख कुटुंब नाराज.
'शिवसैनिक पण सामना वाचत नाही, तो फक्त सकाळी पुसण्यासाठी...'
'शिवसैनिक पण सामना वाचत नाही, तो फक्त सकाळी पुसण्यासाठी...'.
'... म्हणून मी राजकारणात', पंकजा मुंडे यांनी जाहीरपणे व्यक्त केली खंत
'... म्हणून मी राजकारणात', पंकजा मुंडे यांनी जाहीरपणे व्यक्त केली खंत.
'...तोच जिवंत राहील', गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?
'...तोच जिवंत राहील', गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?.