मुंबईतील पॉश एरियात 800 चौरस फुटाचं घर, केवळ 64 रुपये भाडे
मुंबई: मुंबईत राहणं आणि प्रवास या दोन गोष्टी अत्यंत कठीण समजल्या जातात. मुंबईत राहण्यासाठी घरभाडे परवडत नाही, तर गर्दीच्या वेळी लोकल रेल्वेने प्रवास करणे हे मोठं कठीण काम आहे. अशा परिस्थितीत मुंबईत विशेषत: दक्षिण मुंबईत केवळ 64 रुपये भाड्यात तुम्हाला तब्बल 800 चौरस फुटाचं घर मिळालं तर? आपण याबाबत केवळ कल्पानाच करु शकतो. पण दक्षिण […]
मुंबई: मुंबईत राहणं आणि प्रवास या दोन गोष्टी अत्यंत कठीण समजल्या जातात. मुंबईत राहण्यासाठी घरभाडे परवडत नाही, तर गर्दीच्या वेळी लोकल रेल्वेने प्रवास करणे हे मोठं कठीण काम आहे. अशा परिस्थितीत मुंबईत विशेषत: दक्षिण मुंबईत केवळ 64 रुपये भाड्यात तुम्हाला तब्बल 800 चौरस फुटाचं घर मिळालं तर? आपण याबाबत केवळ कल्पानाच करु शकतो. पण दक्षिण मुंबईतील ताडदेव परिसरात केवळ 64 रुपये भाडे असलेले एक 800 चौरस फुटाचं भलं मोठं घरं रिकाम आहे. हे घर थोडेथोडक्या नाही तर तब्बल 11 वर्षांपासून रिकामं आहे.
ताडदेवमधील स्लीटर रोड परिसरात हा फ्लॅट आहे. त्याचं भाडे केवळ 64 रुपये आहे, मात्र एका अटीमुळे हे घर तब्बल 11 वर्षांपासून रिकामं आहे.
हा फ्लॅट धुनजीबॉय बिल्डिंगमध्ये 1940 मध्ये मुंबई पोलिसांतील पारशी अधिकाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आला होता. या भवनचे हक्क पारसी ट्रस्ट आर डी महालक्ष्मीवाला चॅरिटी बिल्डिंग ट्रस्टकडे आहेत.
या ट्रस्टचा मुंबई पोलिसांसोबत करार झाला होता. त्यानुसार हा फ्लॅट केवळ एका पारसी पोलीस अधिकाऱ्याला राहण्यासाठी दिला जाऊ शकतो. मात्र गेल्या 11 वर्षांपासून हा फ्लॅट रिकामा आहे. इथे सहाय्यक पोलीस आयुक्त फिरोज गंजिया हे शेवटचे राहायला आले होते. त्यांनी 2008 मध्ये हे घर सोडलं आणि तेव्हापासून ते रिकामं आहे.
मुंबई पोलिसात केवळ दोन पारसी अधिकारी
पोलीस सहआयुक्त संतोष रस्तोगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसात सध्या केवल दोन पारसी अधिकारी आहेत. त्यापैकी एक पारसी अधिकारी मुंबई बाहेर राहतात तर दुसऱ्या अधिकाऱ्याकडे स्वत:चं घर आहे. त्यामुळे ते या फ्लॅटमध्ये शिफ्ट होण्यास तयार नाहीत. त्यामुळे आता आम्ही हा फ्लॅट ट्रस्टकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे, असं संतोष रस्तोगी यांनी सांगितलं. इंडिया टुडे यांनी याबाबतचं वृत्त दिलं आहे.
मुंबई पोलिसातील अनेक कर्मचाऱ्यांचा अर्ज
दरम्यान, मुंबई पोलिसातीन अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांनी या घरासाठी अर्ज केला आहे. मात्र पारसी ट्रस्टच्या अटीमुळे पारसी अधिकाऱ्याशिवाय हे घर कोणालाही देता येत नसल्याने अडचण झाली आहे.