Chandiwal Commission : चांदीवाल आयोग अनिल देशमुखांच्या उलटतपासणीबाबत लवकरच आपला अहवाल सादर करणार

चांदीवाल आयोगात शेवटचे साक्षीदार अनिल देशमुख यांची साक्ष झाली. आज त्यांच्या साक्षीचा तिसरा दिवस होता. गेले दोन दिवस त्यांची उलटतपासणी सचिन वाझे याचे वकील योगेश नायडू घेत आहेत. ऍड नायडू यांनी अनिल देशमुख यांना अनेक प्रश्न विचारले.

Chandiwal Commission : चांदीवाल आयोग अनिल देशमुखांच्या उलटतपासणीबाबत लवकरच आपला अहवाल सादर करणार
अनिल देशमुख Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 11:09 PM

मुंबई : चांदीवाल आयोगातील माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या उलटतपासणीचा आज शेवटचा दिवस होता. यावेळी त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. काही प्रश्नांना उत्तर देताना अनेक महत्वाची माहिती दिली. याबाबत चांदीवाल आयोग लवकरच आपला अहवाल सादर करणार आहे. आपण सभागृहात सचिन वाझे यांची पाठराखण केली नाही. अँटेलिया कार प्रकरण आणि मानसुख हिरेन यांची हत्या झाल्यानंतरही हे प्रकरण तपासासाठी एटीएसकडे देऊ नये. त्याचा तपास आम्हीच करू असे परबीर सिग यांचं म्हणणं होतं, असं अनिल देशमुख यांनी आपल्या उलटतपासणी आयोगाला सांगितलं. (The Chandiwal Commission will soon submit its report on the cross-examination of Anil Deshmukh)

चांदीवाल आयोगात शेवटचे साक्षीदार अनिल देशमुख यांची साक्ष झाली. आज त्यांच्या साक्षीचा तिसरा दिवस होता. गेले दोन दिवस त्यांची उलटतपासणी सचिन वाझे याचे वकील योगेश नायडू घेत आहेत. ऍड नायडू यांनी अनिल देशमुख यांना अनेक प्रश्न विचारले. सचिन वाझे याची चौकशी करायचे आदेश कुणी दिले मला माहित नव्हतं. कदाचित अतिरिक्त मुख्य सचिव यांनी पोलीस आयुक्त यांच्यामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले असावेत.

काय म्हणाले अनिल देशमुख उलटतपासणीत ?

अँटेलियाच्या घटनेनंतर आम्ही परमबीर सिग यांना बोलावलं होतं. त्यावेळी मी आणि माझ्या सोबत तीन एसीएस होते. सिंग यांना विचारल्यावर ते घाबरले होते. यावेळी आम्ही त्यांना सचिन वाझे यांनी असं का केलं हे विचारलं होतं. त्यावर सचिन वाझे याने असं का केलं याबाबत आपल्याला माहित नाही, असं उत्तर परमबीर सिंग दिलं होतं. त्यानंतर हा सर्व तपास आम्ही एटीएसकडे सोपवत आहोत. असं म्हणालो असता त्यास परमबीर सिंग यांनी विरोध केला. त्यांनी यास मान्यता दिली नाही. त्यानंतर मानसुख हिरेन प्रकरण झाल्यानंतर मी सभागृहात हा तपास एटीएसकडे देत असल्याचं आणि सचिन वाझे याची CIU मधून इतरत्र बदली केल्याचं घोषीत केलं होतं, अशी माहिती देशमुखांनी चांदीवाल आयोगाला दिली.

दरम्यान, या आयोगाच्या सुनावणी दरम्यान दोन खाजगी व्यक्तीने अर्ज केला होता. विमल अगरवाल आणि स्टीफन डिमेलो यांनी अर्ज केले होते. त्यांना साक्षीदार म्हणून आयोगा समोर यायचं होतं. विमल अगरवाल यांनी परमबीर सिग यांच्या विरोधात आणि स्टिफन यांनाही परमबीर सिंग यांच्या विरोधात साक्ष द्यायची होती. मात्र या दोघांचे अर्ज न्या चांदीवाल यांनी आज फेटाळले. (The Chandiwal Commission will soon submit its report on the cross-examination of Anil Deshmukh)

इतर बातम्या

Ulhasnagar Crime : उल्हासनगरात टँकर चालकांकडून ऑईलची चोरी, ढाब्याच्या मालकासह एकूण सात जणांना ठोकल्या बेड्या

Dhule Rada : धुळ्यात नगरपंचायत निवडणुकीनंतर दोन गटात राडा, एका महिलेचा मृत्यू, नागरिकांचे पोलीस ठाण्यासमोर आंदोलन

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.