Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साफसफाईचं काम राज्यातही सुरू झालंय, मुख्यमंत्र्यांचा निशाणा कुणाकडं?

तसंच आपल्याला राज्यातही बाकीची साफसफाई करून टाकायची आहे.

साफसफाईचं काम राज्यातही सुरू झालंय, मुख्यमंत्र्यांचा निशाणा कुणाकडं?
मुख्यमंत्र्यांचा निशाणा कुणाकडं? Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 30, 2022 | 6:33 PM

गिरीश गायकवाड, Tv9 मराठी, प्रतिनिधी, मुंबई : स्वच्छ महाराष्ट्र (Swachh Maharashtra) अभियान टप्पा दोनचा शुभारंभ झाला. नगरविकास (Urban Development)अभियानामार्फत या अभियानाचं काम करताहेत. नगरविकास विभाग जोरात काम करतोय. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे अधिकारी हे विकासाची दोन चाकं आहे. दोन दिवसांत महात्मा गांधी यांची जयंती आहे. स्वच्छतादूत हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे ब्रँड अम्बेसीडर आहेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत सांगितलं.

मुख्यमंत्री म्हणाले, शहरं स्वच्छ,सुंदर झाली पाहिजेत. प्रशासन चांगलं काम करतंय. मोदी यांनी सांगितलं राज्याचं सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार आहेत. राज्य आणि केंद्राच्या योजना पुढं न्यायच्या आहेत.

बाकीचीही साफसफाई केली

2014 मध्ये पंतप्रधानांनी स्वतः हातात झाडू घेतला. स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली. चळवळ निर्माण झाली. प्रत्येक्षात आता अनुभव येतो. बाकीचीही साफसफाईही करून टाकली. तसंच आपल्याला राज्यातही बाकीची साफसफाई करून टाकायची आहे. राज्यामध्ये काम सुरू झालंय, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

आपल्याला चांगली कामं करायची आहेत. आम्ही मोठी कामं करू शकतो. आता राज्यासाठी मोठी कामं करायची आहेत, असंही शिंदे म्हणाले.

शहराचं सौंदर्यीकरण झाल्यास लोकांना जीवनमान उंचावल्यासारखं वाटतं. कामगार आहेत. मॅनपॉवर आहे. कामं केली पाहिजेत. सगळ्या महापालिका चांगल्या करू. अडचणी दूर करण्याचं काम करू. आर्थिक सहकार्याची आवश्यकता आहे, ती करू असं आश्वासन शिंदे यांनी दिलं.

नगरविकास खात्याचे प्रश्न मार्गी लावले

आपणं समाजाचं देणं लागतो, या भावनेनं कामं केली पाहिजे. आयुक्त, सीईओ यांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. नगरविकास खात्याच्या माध्यमातून बरीच चांगली कामं केलीत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विकास कामांचा पाढाचं वाचला. सुशोभीकरण, चांगले रस्ते करायचे आहेत. मदत नक्की करू, असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.

मुंडेंचे सर्व काळे कारनामे..,पोलीस अधिकाऱ्याच्या ऑफरवरून शर्मांचा आरोप
मुंडेंचे सर्व काळे कारनामे..,पोलीस अधिकाऱ्याच्या ऑफरवरून शर्मांचा आरोप.
कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट
कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट.
कराडचा एन्काऊंट अन् कोट्यावधींची ऑफर? निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचा दावा
कराडचा एन्काऊंट अन् कोट्यावधींची ऑफर? निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचा दावा.
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा.
धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केलं छत्रपती संभाजीराजेंचं कौतुक
धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केलं छत्रपती संभाजीराजेंचं कौतुक.
तिसऱ्या दिवशी माझ्यावर खुनाचा गुन्हा..गोरेंनी सांगितली 'ती' मधील घटना
तिसऱ्या दिवशी माझ्यावर खुनाचा गुन्हा..गोरेंनी सांगितली 'ती' मधील घटना.
राज्यातील 'या' भागांना हवामान खात्याचा अलर्ट, पुढील 3 दिवस...
राज्यातील 'या' भागांना हवामान खात्याचा अलर्ट, पुढील 3 दिवस....
धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?
धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?.
रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल
रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल.
बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची मिळाली धमकी
बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची मिळाली धमकी.