कंत्राटी शरद पवार यांचा विचार कष्टकऱ्यांवर नांगर फिरवायला निघाला होता, पण…; गुणरत्न सदावर्ते यांनी सुनावले
ज्यांनी खासगी बँक बुडविली त्यांना तुम्ही एसटी महामंडळाच्या बँकेत आणले. तुमच्या काळातले एक-एक किस्से बाहेर काढले तर रडतानासुद्धा घरात उशीत तोंड घालून रडावे लागेल, असा इशाराचं गुणरत्न सदावर्ते यांनी दिला.
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांची भेट घेतली. त्यानंतर बोलताना सदावर्ते म्हणाले, शरद पवार (Sharad Pawar) आणि त्यांची पिलावडं ही वैचारिकदृष्ट्या त्यांच्या कृतीतून उघडी पडली. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार विलंब होण्याचं कारण शरद पवार आणि अजित पवार यांची पिलावड आहे. जाणूनबुजून अधिकाऱ्यांना हाताशी धरून पगाराची स्लो डाऊन केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शेखर चन्ने यांना वस्तुस्थिती लक्षात आणून दिली. आता शरद पवार यांच्या संघटनेकडे माणूस उपलब्ध नाही. शरद पवार यांचा विचार हा कंत्राटी विचार आहे. हा कंत्राटी विचार कष्टकऱ्यांवर नांगर फिरवायला निघाला होता. पण, शेखर चन्ने यांनी सकाळी सहा वाजता मॅसेज पाठविला की, पगार आजच होणार.
अजित पवार फेस टू फेस बोला
अजित पवार मोठेपणानं सांगता ना डंके की, चोट पे. या फेस टू फेस बोलायला. हे सगळे जण पुण्याचे आहेत. ६७ हजार कष्टकरी एकवटलेले आहेत. हे सर्व कष्टकरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचे आहेत. हिंदुस्थानी विचाराचे आहेत.
तुमच्यासारख्यांचे विचार लोकांच्या लक्षात आले आहेत. ज्यांनी खासगी बँक बुडविली त्यांना तुम्ही एसटी महामंडळाच्या बँकेत आणले. तुमच्या काळातले एक-एक किस्से बाहेर काढले तर रडतानासुद्धा घरात उशीत तोंड घालून रडावे लागेल, असा इशाराचं गुणरत्न सदावर्ते यांनी दिला.
माझ्या नादी लागायचं नाही
माझ्या नादी लागायचं नाही. मी वैचारिकदृष्ट्या सुदृढ आहे. आदर्शमध्ये माझं घर नाही. लक्षात ठेवा. मी लवासावाला नाही. डॉक्टर गुणरत्न सदावर्ते आहे.
कष्टकऱ्यांना मतदानापासून दूर ठेवलं. ही शरद पवार, अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांची खेळी आहे. ते उद्धव बिडात बसलेले असतात आणि अशा खुरापती करायला लावतात, अशी टीकाही सदावर्ते यांनी केली.
कष्टकरी दत्तोपंत ठेंगडींच्या विचाराचा
परिवहन खात्याचा मंत्री उद्धव ठाकरे यांचा होता. मंडळावर ते होते. म्हणून अजित पवार सांभाळून कारण तुमची कृती बेकायदा दिसते. कंष्टकरी एकवटला आहे. तुमच्या कंत्राटी विचाराला बळी पडू शकत नाही. हसन मुश्रीफवाला हा कष्टकरी नाही. हा कष्टकरी दत्तोपंत ठेंगडीच्या विचाराचा आहे. चांगल्याप्रकारे ठेंगा दाखविणार आहे, असंही सदावर्ते यांनी सुनावलं.