11 वाजता पेपर, साडेनऊलाच थर्मल स्क्रिनिंग, बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षेपूर्वीही ‘परीक्षा’

विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांची काळजी घेऊन परीक्षा घेतली जाणार असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दीड तास आगोदर म्हणजे त्यांना साडेनऊ वाजता त्यांच्या परीक्षा केंद्रावर पोहचणं गरजेचं आहे.

11 वाजता पेपर, साडेनऊलाच थर्मल स्क्रिनिंग, बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षेपूर्वीही 'परीक्षा'
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: google
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 8:03 AM

मुंबई – कोरोनाच्या (corona) काळात अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना बारावीची परीक्षा (exam) होईल की नाही यावर शंका होती. परंतु यावर्षी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन (offline) होणार असल्याने विद्यार्थी (student) सुध्दा परीक्षेच्या तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहे. मागच्या दोन वर्षात परीक्षा झाली नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचा तोटा होत असल्याचे अनेक पालकाचे मत होते. तर अनेक पालकांनी त्यावर काहीतरी तोडगा काढावा असं आवाहन केलं होतं. परंतु कोरोनाचा संसर्ग इतका जबरदस्त होता, अनेकदा शाळा बंद कराव्या लागल्या. तसेच आत्ताही देशात तिसरी लाट असून काळजी घेऊन विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार असल्याचे समजते. त्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापकांना आणि शिक्षकांना मोठी कसरत करावी लागेल असं वाटतंय.

साडेनऊलाच थर्मल स्क्रिनिंग

विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांची काळजी घेऊन परीक्षा घेतली जाणार असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दीड तास आगोदर म्हणजे त्यांना साडेनऊ वाजता त्यांच्या परीक्षा केंद्रावर पोहचणं गरजेचं आहे. कारण तिथं गेल्यानंतर विद्यार्थ्यांची थर्मल स्क्रिनिंग तपासणी करण्यात येईल. तपासणी झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांला गेटवरून परीक्षा केंद्रात सोडण्यात येईल. तिथं ज्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या बाबतीत शंका उपस्थित होईल त्याबाबत काय निर्णय घ्यायचा हे अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. तसेच त्याबाबत तिथलं केंद्र प्रमुख निर्णय घेतील. त्यामुळे सकाळी साडेनऊच्या पेपरला जाताना विद्यार्थ्यांनी आपलं सगळं आटोपून नाष्टा करून परीक्षा केंद्रावर जाव लागेल. दोन वर्षानंतर परीक्षा घेणं मुख्याध्यापक आणि शिक्षकांना काहीसं अवघड जाईल असं वाटतंय.

बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षेपूर्वीही ‘परीक्षा’

कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळात अनेक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा दिली. तसेच काहीवेळेला शाळांनी मागच्या परीक्षेचे गुण धरून पुढच्या वर्गात त्यांना पुढे ढकलले. त्यामुळे दोन वर्षांनी परिक्षा देत असताना विद्यार्थ्यांसमोर एक दडपण असेल. तसेच ऑनलाइन तासिकेला हजेरी लावलेल्या आपल्या पाल्याला ऑफलाइन पेपर द्यायला जमेल का अशी चिंता पालकांना सतावत असेल. त्यामुळे कोरोनाच्या काळात पास झालेल्या विद्यार्थ्यांची आता परीक्षेपुर्वी परीक्षा असणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर मोजकं साहित्य घेऊन जाव लागणार आहे. त्याचबरोबर सुरूवातील त्यांची चाचणी केल्याशिवाय कोणत्याही विद्यार्थ्यांला परीक्षा केंद्रावर सोडणार नाहीत. प्रत्येक पेपरच्या आगोदर विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांना त्याचा त्रास देखील सहन करावा लागणार आहे.

तब्बल 24 तास उलटले, तरी यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरूचं; घराबाहेर शिवसैनिक आक्रमक

ट्रक चालकाने ब्रेक लावले, मागून बस धडकली, बसच्या चाकाखाली येऊन बाईकस्वाराचा मृत्यू

रशिया – युक्रेन युद्धाबाबत अर्थमंत्र्यांची चिंता; अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होण्याची भीती

'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.