1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपी सलीम गाझीचा मृत्यू, साखळी स्फोटात सलीम गाझीची काय भूमिका?
1993 च्या बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपी सलीम गाझी याचा मृत्यू झाल्याचं वृत्त हाती येतंय. शनिवारी पाकिस्तानमधील कराची येथे आरोपी सलीम गाझी याचा मृत्यू झाला असल्याचं वृत्त एएनआय वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
मुंबई : 1993 च्या बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपी सलीम गाझी (1993 Mumbai Bomb Blast) याचा मृत्यू झाल्याचं वृत्त हाती येतंय. शनिवारी पाकिस्तानमधील कराची येथे आरोपी सलीम गाझी याचा मृत्यू झाला असल्याचं वृत्त एएनआय वृत्तसंस्थेनं दिलं आहे. मुंबई पोलिस सूत्रांनी रविवारी एएनआय या वृत्तसंस्थेला याबाबतची माहिती दिली असून सलीम गाझी हा दाऊद टोळीचा सदस्य होता. सलिम गाझी छोटा शकीलचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जायचा. दाऊदसोबतही त्याचे जवळचे संबंध होते . सलीम गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असल्याच्याही काही बातम्या समोर आल्या होता. सलीम गाझीला हाय ब्लडप्रेशरसह अन्य आजारही होते. दरम्यान, आता शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचं वृत्त हाती आलं आहे. 1993 साली मुंबई झालेल्या बॉम्बस्फोटात सलीम गाझी (Saleem Gazi) व्यतिरिक्त छोटा शकील, दाऊद इब्राहिम, टायगर मेनन आणि त्याच्या कुटुंबीयांचाही सहभाग होता. या हल्ल्यात सुमारे 250 लोकांचा मृत्यू झाला होता तर 600 हून अधिक लोक जखमी झाले होते.
The most wanted 1993 serial blast accused Salim Gazi, a member of the Dawood gang and close aide of Chota Shakeel died on Saturday in Karachi, Pakistan: Mumbai Police Sources
— ANI (@ANI) January 16, 2022
12 मार्च, 1993 रोजी मुंबईतील बॉम्बब्लास्टचा संपूर्ण घटनाक्रम
1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटात तब्बल 257 लोकांची जीव गेला होता. तर 713 गंभीरीत्या जखमी झाले होते. या दहशतवादी हल्ल्यात मुंबईतील एकूण 27 कोटी रुपयांहून अधिक मालमत्तेचं नुकसान झालं होतं. संपूर्ण देश 1993 मधील बॉम्बब्लास्टच्या घटनेनं हादरुन गेला होता. मुंबईतील बॉम्बस्फोटाचा कट सुनियोजितपणे आखला गेला होता. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा इशारा मिळाल्यानंतर मुंबईतील बॉम्बस्फोटांसाठी सर्वप्रथम लोकांची निवड करण्यात आली होती. या सगळ्यांना दुबईमार्गे पाकिस्तानात पाठवून प्रशिक्षण देण्यात आलं होतं. तस्करीचे जाळे वापरून दाऊदने अरबी समुद्रमार्गे स्फोटके मुंबईत पोहोचवली होती. मुंबईतील विविध भागात सुमारे दोन तास हे स्फोट सुरू होते. या घटनेनं संपूर्ण मुंबई ठप्प झाली होती.
पहिला स्फोट मुंबई शेअर बाजाराजवळ पहाटे दीड वाजता झाला होता. तर शेवटचा स्फोट पहाटे 3.30 वाजता झाला होता. 2007 साली या प्रकरणातील खटल्याच्या पहिल्या टप्प्यात टाडा न्यायालयाने याकुब मेमनसह 100 आरोपींना दोषी ठरवले होते, तर 23 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.
कोण आहे सलीम गाझी?
सलमी गाझी हा 1993च्या बॉम्बस्फोट हल्ल्यातील मोस्ट वॉन्टेट आरोपी
दाऊन इब्राहिमच्या जवळचा म्हणून त्याची ओळख
छोटा शकीलचा निकटवर्तीय म्हणून परिचीत
1993च्या ब्लास्टमध्ये दाऊद टोळीचा सलीम गाझीचा सहभाग