Monsoon Session : खाऊन खाऊन 50 खोके, माजलेत बोके माजलेत बोके..! विरोधकांच्या घोषणाबाजीनं दणाणला विधानभवनाचा परिसर

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र आजही विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. घोषणाबाजी करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना विशेषत: शिंदे गटातील आमदारांना डिवचण्याचा प्रयत्न केला.

Monsoon Session : खाऊन खाऊन 50 खोके, माजलेत बोके माजलेत बोके..! विरोधकांच्या घोषणाबाजीनं दणाणला विधानभवनाचा परिसर
घोषणाबाजी करताना विरोधकImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 25, 2022 | 12:01 PM

मुंबई : खाऊन खाऊन 50 खोके, माजलेत बोके माजलेत बोके, ईडी सरकारचे करायचे काय-खाली डोके वर पाय, 50 खोके एकदम ओके, 50 खोके 50 खोके माजलेत बोके, माजलेत बोके, अशा घोषणाबाजीने विधानभवनाचा (Vidhan Bhavan) परिसर दणाणून गेला. विरोधकांनी आजही विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत आंदोलन केले. विशेष म्हणजे सत्ताधारी आमदारांनीही विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन (Protest) केले. काल सत्ताधारी विशेषत: शिंदे गटाचे आमदार आणि विरोधी पक्ष आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली होती. आज दोघांनीही घोषणाबाजी करत आंदोलन केले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विरोधकांनी करत सरकारचा निषेध केला. राज्यात अतिवृष्टीमुळे (Heavy rain) प्रचंड नुकसान झाले. मात्र मदत देणे तर दुरच मात्र केवळ राजकारण सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे.

विरोधकांच्या आंदोलनातही विविधता

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र आजही विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. घोषणाबाजी करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना विशेषत: शिंदे गटातील आमदारांना डिवचण्याचा प्रयत्न केला. 50 खोके एकदम ओके अशा घोषणाबाजी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधक करीत असून पहिल्यापासूनच आक्रमक पवित्रा विरोधकांनी घेतला होता. 50-50 बिस्कीट पुडे घेऊनही विरोधकांनी आंदोलन केले होते. हातात फलक घेऊन जोरजोरात घोषणाबाजी विधानभवनाच्या पायऱ्यांवर करण्यात आली. आजही महाराष्ट्र के गद्दारोंको, जुते मारो, सालों को, ओला दुष्काळ जाहीर करा, नाही तर खुर्च्या खाली करा, अशा प्रकारच्या घोषणा करण्यात आल्या.

हे सुद्धा वाचा

शिंदे गटावर आली स्पष्टीकरण देण्याची वेळ

विरोधकांची घोषणाबाजी तर पाहायला मिळालीच. मात्र तत्पूर्वी सत्ताधाऱ्यांनीही विधानभवनाच्या पायऱ्यांवर आधीच येत विरोधकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. लवासाचे खोके एकदम ओके, महसूलचे खोते, सोनिया ओके अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. विरोधकांच्या खोक्यांच्या घोषणेवर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला. आम्ही एकही रुपया घेतलेला नाही. केवळ बाळासाहेबांचा विचार आणि आणि हिंदुत्वासाठी आम्ही भाजपासोबत गेलो, असे स्पष्टीकरण देण्याची वेळ शिंदे गटातील आमदारांवर आल्याचे यानिमित्ताने दिसून आले.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.